दुचाकी अपघातात
तरुण ठार; एक जखमी
भरणे शिंदेवाडीजवळ दुचाकी घसरली
खेड, ता. ८ः मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडीनजीक भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुण ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. अद्वैत प्रवीण गीते असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (ता. ७) रात्री अकराच्या सुमारास झाला.
अद्वैत प्रवीण गीते दुचाकीने मित्रासह महामार्गावरून कळंबणीच्या दिशेने जात होता. भरणे गावाच्या हद्दीत शिंदेवाडी परिसरात दुचाकी भरधाव वेगात असताना अचानक दुचाकीवरील ताबा सुटून महामार्गावर घसरली. या अपघातात अद्वैत दुभाजकावर आपटला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला अद्वैतचा मित्रदेखील गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्वैत गीते हा नवभारत हायस्कूलचे शिक्षक प्रवीण गीते यांचा मुलगा असून त्यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील तिसंगी आहे. अपघाताची माहिती मिळताच भरणे परिसरातील नातेवाईक, हितचिंतक आणि मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.