swt817.jpg
29556
सिंधुदुर्गनगरी : ‘अस्मिता लीग’ स्पर्धेतील विजेत्यांसोबत अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम व इतर.
स्पर्धेत विजयापेक्षा ‘अस्मिता’ जपा
नयोनी साटमः सिंधुदुर्गात महिला दिनी विविध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः स्पर्धेत हार-जीत महत्त्वाची नसते. हरलो तरी पुढे उठून चालायचे असते, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक नयोनी साटम यांनी जागतिक महिला दिनी आयोजित अस्मिता लीग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
महिला दिनाचे औचित्य साधून केंद्राच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘अस्मिता लीग’ या स्पर्धेचे आज सकाळी ८.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम माय भारत, सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा विभाग, सिंधुदुर्ग व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढविणे, शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच ग्रामीण, शहरी आणि अर्धशहरी भागातील मुली व महिलांना क्रीडामध्ये संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन नयोनी साटम यांच्या हस्ते झाले. यावेळी भूसंपादन उपजिल्हाधिकारी आरती देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, ''माय भारत''च्या अपेक्षा मांजरेकर उपस्थित होते. प्रस्तावना नीलिमा अडसूळ यांनी केली.
आरती देसाई यांनी महिला दीन का साजर केला जातो व तो ८ मार्चलाच का साजरा केला जातो, याची माहिती दिली. महिलांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले. नियमित व्यायाम आणि धावण्याचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व सांगितले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांनी उत्साहाने धाव घेत कार्यक्रम यशस्वी केला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्र तसेच सहभागी झालेल्या खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ॲथलेटिक असोसिएशन सचिव कल्पना तेंडुलकर, खेलो इंडिया सेंटर प्रशिक्षक अलिस्का आल्मेडा, बाळकृष्ण कदम, हितेश माळणकर यांनी सहकार्य केले.
या स्पर्धेतील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतील १३ वर्षांखालील गटात दिव्या मालणकर, मैथिली गावडे, झोया शैख, १३ ते १८ वर्ष गटात विनिता निकम, मेली डिसोझा, मान्यता पेडणेकर, १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटात सायली रावूळ, मृण्मयी कांबळे, नम्रता गावकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतील १३ वर्षांपेक्षा कमी वयोगटात दिव्या वेळीप, पायाल पवार, झोया शैख, १३ ते १८ वर्ष वयोगटात वनिता निकम, मान्यता पेडणेकर, भार्गवी पाटकर, १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटात सायली रावूळ, मृण्मयी कांबळे, रेखा पुजारे यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले.
४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत १३ वर्षांपेक्षा कमी वयोगटात मैथिली गावडे, अनू निकम, सानिका पवार, १३ ते १८ वर्षे वयोगटात सुवर्ण वाघमारे, गौरी परब, मनीषा पवार, १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटात निकिता लाड, नम्रता गावकर, रेखा पुजारी यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. सर्व विजेत्यांना स्पर्धेच्या ठिकाणी गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.