कोकण

परुळे येथे महिला दिनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

29564

परुळे येथे महिला दिनी
रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
म्हापण ः परुळे पंचक्रोशीतील महिलांनी आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. यानिमित्त परुळे येथे काढलेल्या रॅलीमध्ये बहुसंख्य महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. यामध्ये महिलांनी सावित्री फुले, माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई अशी वेशभूषा साकारली. नऊवारी साडी, नाकात नथ अशा पारंपरिक पेहराव करून ढोल वादन करणाऱ्या युवती या रॅलीचे खास आकर्षण ठरल्या. माड्याचीवाडी हायस्कूलच्या मुलांच्या ढोल-ताशाच्या गजरात रॅली उत्साहात झाली. वराटी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंचक्रोशीतील अनेक महिलांनी कलाविष्कार सादर केले. अरुणा सामंत यांच्या मालवणी गाऱ्हाण्याने या कार्यक्रमास सुरुवात झाली. मांजर्डेवाडी ग्रुपचे वारकरी भजन, आजारवाडी ग्रुपचे कोळी नृत्य आणि समूह नृत्य बहारदार होते. कल्पना सामंत आणि अनुराधा सामंत यांची सुमधुर गाणी, कविता जोशी आणि रिद्धी प्रभू यांचे ''ओल्ड इज गोल्ड'', दीपा तुळसकर यांचे जोगवा नृत्य लक्षवेधी ठरले. यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, रुग्ण सेवाचे दीपा तुळसकर, उद्योजिका विद्या राणे यांचा सत्कार करण्यात आला. रश्मी सामंत, सानवी देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा तेली यांनी प्रास्ताविक केले. अंजली तेली यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

Pan Masala Plastic Ban : पान मसाला खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Latest Marathi News Live Update : माझा विजय म्हणजे गोरगरीब जनतेचा विजय- देशमुख

'झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…' सिद्धार्थ जाधव जुन्या आठवणी सांगताना म्हणाला... लाइट सुरू ठेवण्यासाठी आम्ही

SCROLL FOR NEXT