कोकण

रत्नागिरीत ८१ लाखांच्या खैर लाकडांची तस्करी रोखली

CD

२९५६७

रत्नागिरीत खैराची तस्करी रोखली
निवळी येथे दोन वाहने जप्त ः ८१ लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीला चाप लावण्यासाठी रत्नागिरी पोलिस दल सक्रिय झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी निवळी-बावनदी येथे सापळा रचून खैराच्या लाकडांची तस्करी करणारी दोन वाहने पकडली. कारवाईत एकूण ८१ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन संशयितांना अटक केली. अजित गंगाराम चव्हाण (वय २६, रा. आंबडस, खेड), अरबाज हमीद सुर्वे (३४, रा. गवळीवाडी, खेड), अक्षय राजू चव्हाण (वय २८, रा. भिंगळोली, मंडणगड) अशी तिघांची नावे आहेत.
७ मार्चला सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक निवळी-बावनदी परिसरात गस्तीवर होते. यावेळी संशयास्पदरीत्या जाणाऱ्या दोन वाहनांना थांबवून तपासणी केली असता हा तस्करीचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी केलेल्या तपासणीत दोन वाहनांमध्ये खैर जातीच्या झाडांची लहान-मोठ्या आकारांतील एकूण १८१ नग लाकडे आढळली. लाकडांच्या वाहतुकीसाठी चालकांकडे कोणताही अधिकृत परवाना नव्हता. चोरीच्या उद्देशाने ही वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी लाकडांसह दोन वाहने असा एकूण ८१ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाने केली. या पथकात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, सहाय्यक पोलिस फौजदार सुभाष भागणे, हेड कॉन्स्टेबल नितीन डोमणे, भैरवनाथ सवाईराम आणि श्री. कांबळे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT