‘माझी वसुंधरा’ स्पर्धेतील
विजेत्यांचा वेर्लेत सत्कार
सावंतवाडी ः मुंबई येथे वेर्ले ग्रामविकास मंडळ मुंबईतर्फे ‘माझी वसुंधरा’, ५.० उंच उडी स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविळेल्या वेर्लेचे सरपंच सुचिता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, सदस्य दिलीप राऊत, पल्लवी राणे, ग्रामसेवक राजेश ठाकुर यांचा सन्मान सोहळा नुकताच झाला. मंडळाचे अध्यक्ष मोहन राऊळ आणि सहकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मान्यवरांचा गौरव केला. मुंबई मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गाव विकासाबाबत चर्चा केली. त्यावर सरपंच राऊळ यांनी, आपल्या सूचना विचारात घेतल्या जातील, असे सांगितले. मोहन राऊळ, रमेश राऊळ, अमोणकर, नामदेव राऊळ, एकनाथ बिडये यांनीही विचार मांडले. उपसरपंच मोहन राऊळ, ग्रामपंचायत सदस्य दिलीप राऊळ, अनू राऊळ, पल्लवी राणे, श्रीधर राऊळ उपस्थित होते. विष्णू राऊळ यांनी सूत्रसंचालन केले. अनिल राऊळ यांनी आभार मानले.
.......................
डॉ. खानोलकर यांना
उद्या पुरस्कार प्रदान
सावंतवाडी मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाने महिला दिनानिमित्त देण्यात येणारा यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार सावंतवाडी येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी खानोलकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवारी (ता. ११) सायंकाळी ४ वाजता वाचनालय सभागृहात होणार आहे. लेखिका व मानसशास्त्रीय समुपदेशक कावेरी कासरलकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाच्या संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
.......................
माणगाव येथे आज
वजन-मापे मुद्रांकन
कुडाळ ः निरीक्षक वैद्य मापनशास्त्र विभाग, कुडाळतर्फे माणगाव येथील व्यापारी बांधवांनी काटे, वजन मापे, इलेक्ट्रिक काटे यांचे फेरपडताळणी व मुद्रांकन (शिक्के) करण्यासाठी माणगाव येथे १० व ११ मार्चला पडताळणी शिबिर आयोजित केले आहे. सर्व मच्छीमार, रॉकेल, काजू, किराणा, रेशन दुकान, भाजी व चिकन, मटण विक्रेत्यांनी काटे, वजने मापे सकाळी ९ वाजता घेऊन यावीत. तसेच आपले आधारकार्ड, मागील पावती व प्रमाणपत्र गरजेचे आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन विजय नेमळेकर यांनी केले आहे.
......................
कसाल येथे शुक्रवारी
रोंबाट-राधानृत्य स्पर्धा
सिंधुदुर्गनगरी ः शिमगोत्सवानिमित्त कसाल येथे शुक्रवारी (ता. १३) रोंबाट व राधानृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्या प्रथम क्रमांकास ५० हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकास २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस तसेच राधानृत्य स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ५ हजार, ३ हजार रुपये अशी बक्षिसांची खैरात केली आहे. कसाल येथील सिद्धिविनायक मित्रमंडळ आणि पावणाई रवळनाथ मित्रमंडळ यांच्या वतीने सायंकाळी ७ ते ११ या वेळेत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
......................
असनिये गावचा
आज शिमगोत्सव
ओटवणे ः असनिये गावचा आगळावेगळा व वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव उद्या (ता. १०) साजरा होत आहे. या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रीय शिमगोत्सवाला जिल्ह्यासह गोवा राज्यातून भाविकांची अलोट गर्दी होते. सकाळी १० वाजता हळदवणी झाल्यानंतर गावात खेळ सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी दुपारी १२ वाजता ईकाच्या वाटीतील तीर्थाचे गोसाव्यांमार्फत वाटप होते. लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान मानकरी, कमिटी आणि असनियेवासीयांनी केले आहे.
......................
सावंतवाडीत उद्या
ज्येष्ठ नागरिक सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा बुधवारी (ता. ११) सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.