कोकण

कुंबळे येथे २६३ दाखल्यांचे वितरण

CD

- rat९p१.jpg-
२६O२९६५८
कुंबळे : आयोजित ‘समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्र. १ अंतर्गत कार्यक्रमात लाभार्थी नागरिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करताना उपस्थित मान्यवर.
----
कुंबळे येथे २६३ दाखल्यांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ९ ः छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत तालुक्यातील कुंबळे महसूल मंडळाचे पहिले शिबिर कुंबळे जिल्हा परिषद शाळेत झाले. यामध्ये विविध प्रकारच्या २६३ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरातून तालुक्यातील अभियानाची सुरुवात झाली.
समाधान शिबिरात वाटप केलेल्या दाखल्यांमध्ये ४५ उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र १३, अधिवास प्रमाणपत्र ६, जात प्रमाणपत्र २१, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र १, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ४, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती ११३, नवीन शिधापत्रिका ७, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मंजुरी प्रमाणपत्र ७, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेची प्रमाणपत्रे २, आयुष्मान भारत कार्ड ७ तसेच विविध योजनांची ५७ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, अस्मिता केद्रे, पंचायत समिती सदस्य दीपक मालुसरे, अनिल रटाटे, नितीन म्हामुणकर, अनंत शिंदे, इरफान बुरोंडकर तसेच माजी सरपंच किशोर दळवी यांसह तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. हे शिबिर तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी सुनील खरात, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT