कोकण

बांद्यात उखाणा स्पर्धेला प्रतिसाद

CD

swt915.jpg
29700
बांदा ः उखाणा स्पर्धेतील विजेत्या महिलांसोबत उपस्थित असलेल्या महिला भगिनी व मान्यवर.

बांद्यात उखाणा स्पर्धेला प्रतिसाद
‘सकाळ’ चा उपक्रम ः भक्ती सावंत यांना प्रथम क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘दैनिक सकाळ’ व बांदा महिला मराठा मंडळ यांच्यावतीने येथे आयोजित केलेल्या उखाणा स्पर्धेला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या १८ स्पर्धकांनी नावीन्यपूर्ण व रंजक उखाणे सादर करत स्पर्धेत रंगत आणली.
स्पर्धकांच्या सादरीकरणाचे परीक्षण करून गुणांकन करण्यात आले. त्यानुसार भक्ती सावंत यांनी सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
रिना मोरजकर यांनी द्वितीय, रेश्मा सावंत यांनी तृतीय क्रमांक मिळविला. महेश्वरी धुरी यांना चतुर्थ, शिल्पा सावंत यांना पाचवा क्रमांक मिळाला. परीक्षण निकिता सावंत, शुभेच्छा सावंत यांनी केले. यावेळी महिला मराठा समाज अध्यक्ष सौ स्वाती सावंत, सचिव माधवी गाड, मराठा समाज अध्यक्ष विराज परब, पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, घारपी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जे डी पाटील, ''सकाळ''चे वितरण प्रतिनिधी गुरुनाथ कदम, बांदा प्रतिनिधी नीलेश मोरजकर आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गुरुनाथ कदम यांनी ‘सकाळ’च्या विविध प्रकाशनांची माहिती उपस्थितांना दिली. रिना मोरजकर यांनी सूत्रसंचालन केले. माधवी गाड यांनी आभार मानले. यावेळी बांदा शहरातील मराठा समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT