कोकण

पर्यावरणविषयी जागृतीसाठी शिमग्यात ‘निसर्ग देवाक शबय’

CD

लोगो ः विधायक
------
29673

पर्यावरणविषयी जागृतीसाठी शिमग्यात ‘निसर्ग देवाक शबय’

मोरगा, आडाळीत पथनाट्य; घातक प्रकल्प, नदी संवर्धनाबाबत जागृती

सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. ९ : राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने शिमग्यानिमित्त मोरगाव आणि आडाळी येथे पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी ‘निसर्ग देवाक शबय’ हे आगळ्यावेगळ्या धाटणीचे पथनाट्य सादर करण्यात आले. या उपक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
राष्ट्र सेवा दल, अनुभव शिक्षा केंद्र आणि रानमाणूस फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या उपक्रमाला ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे सहकार्य लाभले. मोरगाव बौद्धवाडी येथील समाजमंदिर आणि आडाळी येथील नवरात्र मंडपात हे पथनाट्य सादर करण्यात आले. टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी या उपक्रमाला दाद दिली.
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा दलाचे ॲड. प्रवीण नाईक, ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत, सचिव डॉ. सई लळीत, आडाळीचे सरपंच पराग गावकर, समता कला क्रीडा मंडळाचे बाळकृष्ण कदम व अमोल कदम यांचे सहकार्य लाभले. सहदेव पाटकर, श्रेयश शिंदे, अमोल तांबे, युगांत चव्हाण, सत्यवान गावकर, शशांक कांबळे, संदीप सडेकर, दुर्वांक मेस्त्री, तन्मय पंडित या कलाकारांनी हे पथनाट्य सादर केले. दुर्वांक मेस्त्री यांच्या घुमट वादनाने सर्वांची मने जिंकली. या पथनाट्य चमूने आडाळी येथील घुंगुरकाठी भवनला सदिच्छा भेटही दिली.
----
पथनाट्यातून नेमका संदेश
वेगाने होत असलेले नागरीकरण, पायाभूत सुविधांच्या नावाखाली होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, नद्यांकडे झालेले दुर्लक्ष, ‘शक्तिपीठ’ महामार्गासारखे अनावश्यक व घातक प्रकल्प आणि धनदांडग्यांकडून ओरबाडल्या जाणाऱ्या जमिनी अशा गंभीर समस्यांवर या पथनाट्याने रोखठोक भाष्य केले. या पथनाट्याचे लेखन अभिनेता श्रेयश शिंदे यांनी केले. यात शिंगोबा (डोंगर), निळी माय (नदी), वसुंधरा (पृथ्वी), शंखासूर, सरपंच, राक्षस, शेतकरी आणि व्यापारी अशा विविध लक्षवेधी भूमिकांचा समावेश होता. ‘‘नद्यांचे रक्षण करा, जमिनी विकू नका, झाडे राखा आणि प्लास्टिकचा वापर टाळा’’, असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT