swt95.jpg
29677
बांदा ः असीसी शाळेत शिक्षक संघातर्फे वस्तू वाटप करण्यात आले.
प्राथमिक शिक्षक संघातर्फे
असीसी शाळेत वस्तू वाटप
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केवळ औपचारिक कार्यक्रम न करता, सामाजिक बांधिलकी जपत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडी महिला सेलच्या वतीने एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. इन्सुली येथील ‘असीसी मतिमंद मुलींची शाळा’ येथे या विशेष मुलींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला.
उपस्थितांनी या मुलींशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी राज्य उपाध्यक्ष म. ल. देसाई, राज्य संघटक सृष्टी पाटील, जिल्हा सचिव महेश पालव, महिला सेल जिल्हाध्यक्षा तेजस्विता वेंगुर्लेकर, उपाध्यक्षा प्रणिता मांडवकर, श्रेया परब, तालुकाध्यक्षा शुभेच्छा सावंत, सचिव रोशनी राऊत, तालुकाध्यक्ष विजय गावडे, तालुका सचिव रुपेश परब, कार्याध्यक्षा अर्चना देसाई तसेच रोशन राऊत, मृगाली पालव, सीमा पंडित, मनाली कोरगावकर, अमिषा कुंभार आदी सदस्या उपस्थित होत्या. असीसी शाळेच्या व्यवस्थापनाने शिक्षक संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.