कोकण

पाट मराळवाडी सातेरी देवीचा रविवारपासून वर्धापन सोहळा

CD

पाट मराळवाडी सातेरी देवीचा
रविवारपासून वर्धापन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ९ ः पाट-मराळवाडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरी मातेचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा रविवार (ता. १५) व सोमवारी (ता. १६) मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने श्री देवी सातेरी मित्रमंडळ, पाट मराळवाडी यांच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता स्थानिक ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, ७ वाजता विठ्ठल रखुमाई वारकरी भजन मंडळ, पाट-म्हापण पंचक्रोशी यांचे भजन,
सोमवारी मुख्य वर्धापन सोहळ्यानिमित्त सकाळी ७ वाजल्यापासून पंचायतन आराधना आणि सातेरी मातेचा पंचायतन याग, ९ वाजता लघुरुद्र, श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, दुपारी १२.३० वाजता भाविकांसाठी महाप्रसाद, २.३० वाजता ग्रामस्थांची भजने, महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी ५ वाजता मोरेश्वर महिला फुगडी मंडळ (वाघचौडी, नेरुर) यांचा फुगडीचा कार्यक्रम, ६ वाजता रामकृष्ण भजन मंडळ (पाट), ७ वाजता श्री देवी माऊली वारकरी भजन मंडळ (किनळोस) यांचे भजन, रात्री ९.३० वाजता (कै.) लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत आणि सिद्धेश कलिंगण संचालित कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा पौराणिक ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ''पृथ्वीकंकण'', पहाटे काकड आरतीने सोहळ्याची सांगता होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी सातेरी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: महसूल विभागालाच चकवा! बनावट शासकीय आदेशांचे रॅकेट उघड; भूमाफियांमध्ये खळबळ, महसूल अभिलेखांत फेरफार

IND vs ENG: भारतीय फॅन्ससाठी भारत-इंग्लंड T20I सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल, ECB चा निर्णय; किती वाजता सुरू होणार मॅच?

गॅस नाही, सुरुवातीला फक्त हवाच येते; पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये गृहिणींची तक्रार, PNG तुटवड्याने हैराण

Heavy Rain Alert Maharashtra : कोकणासह सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज, मॉन्सूनचे ढग आणखी तीव्र

Belhekarwadi farmers: राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव, रेल्वे भूसंपादनाविरोधात बेल्हेकरवाडीत संतापाचा उद्रेक

SCROLL FOR NEXT