कोकण

दापोली-मुरुडमध्ये साडेचार हजार कासवांच्या अंड्याचे संरक्षण

CD

rat9p8.jpg
29725
दापोली ः मुरूड समुद्र किनाऱ्यावर कासवांची घरटी संरक्षित केली आहेत.
-------------
मुरुडमध्ये साडेचार हजार कासवांच्या अंड्याचे संरक्षण
डिसेंबरमध्ये पहिले घरटे : ७ कासवांची पिल्ले समुद्रात विसावली
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ९ ः तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी कासवांच्या संवर्धनासाठी यंदा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला आहे. येथे ४६ घरट्यांमधील सुमारे ४५०० अंडी सुरक्षितपणे संरक्षित केली आहेत. स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि वन विभागाच्या सहकार्याने हा संवर्धन उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
मुरुड समुद्रकिनाऱ्यावर कासवांनी घातलेली अंडी भरती-ओहोटी, भटकी प्राणी तसेच इतर नैसर्गिक संकटांपासून सुरक्षित राहावीत यासाठी ती काळजीपूर्वक संरक्षित ठिकाणी हलवून जतन केली आहेत. १९ डिसेंबरला येथे पहिले घरटे संरक्षित केले होते. या घरट्यांपैकी पहिल्या घरट्यातून २० फेब्रुवारीला ७ कासवांची पिल्ले बाहेर पडली असून, अजूनही त्या घरट्यात काही अंडी शिल्लक आहेत. उर्वरित अंड्यांमधूनही पुढील काही दिवसांत पिल्ले बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसेच १४ मार्चपासून पुढील घरट्यांमधून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात होईल, अशी माहिती स्थानिक जीवरक्षकांनी दिली. सध्या वातावरणात होत असलेल्या बदलांचा देखील या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. सकाळी वातावरण थंड असते, तर सकाळी साधारण १० वाजल्यानंतर कडक उन्हाचे चटके जाणवू लागतात, त्यामुळे अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे कांदळवन विभागाचे अधिकारी किरण ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT