उद्यासाठी या बातमीला जाहिरात आहे. प्राधान्याने घ्यावी.
---
29747
कुडाळ ः येथील आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेत गोवन स्ट्रायकर संघ ‘प्रिन्स समादेवी कलेश्वर ट्रॉफी’चा मानकरी ठरला.
29748
कुडाळ ः दुसऱ्या छायाचित्रात उपविजेता फ्रेंडशिप चेदवण संघ. (छायाचित्र ः अजय सावंत)
गोवन स्ट्रायकर्स संघ ठरला विजेता
कुडाळातील डे-नाईट क्रिकेट; फ्रेंडशिप चेंदवण संघाला उपविजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ : येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पाच दिवसांपासून सुरू असलेल्या भव्य आंतरराज्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत गोवन स्ट्रायकर्स (गोवा) संघाने अचूक गोलंदाजी आणि चतुरस्त्र क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ‘प्रिन्स समादेवी-कलेश्वर ट्रॉफी’वर आपले नाव कोरले. फ्रेंडशिप चेंदवण संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
प्रिन्स समादेवी मित्रमंडळ (कुडाळ) व कलेश्वर मित्रमंडळ (नेरुर) यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यातील रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना फ्रेंडशिप चेंदवण संघाने पीटर फर्नांडिस (२३), सोहेल शेख (१८) आणि बबन नाईक (२१) यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित ८ षटकांत ७० धावा उभारल्या. गोवन स्ट्रायकर्सच्या रोहन साळगावकर याने टिच्चून गोलंदाजी करत २ षटकांत केवळ ५ धावा देऊन २ गडी बाद केले. ७१ धावांचे आव्हान गोवन स्ट्रायकर्सने रजत कुडाळकर (२३) आणि भूषण गोळे (१५) यांच्या फलंदाजीच्या जोरावर सहजपणे पार केले.
यात मालिकावीर-रजत कुडाळकर (गोवन स्ट्रायकर्स), उत्कृष्ट फलंदाज-सुमित डोंगरे (फ्रेंडशिप चेंदवण), उत्कृष्ट गोलंदाज-रोहन साळगावकर (गोवन स्ट्रायकर्स), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक-गौरेश नागवेकर (गोवन स्ट्रायकर्स), उत्कृष्ट यष्टिरक्षक-गोपाळ बटा (फ्रेंडशिप चेंदवण), अंतिम सामनावीर-रोहन साळगावकर (गोवन स्ट्रायकर्स) यांनी लक्षवेधी कामगिरी केली.
उपांत्य फेरीचा पहिला सामना फ्रेंडशिप चेंदवण विरुद्ध भाव्यांश साईश इलेव्हन (सावंतवाडी) यांच्यात झाला. फ्रेंडशिप संघाने १८ चेंडूत ३९ धावा करणाऱ्या सुमित डोंगरेच्या जोरावर ९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात साईश इलेव्हनला ९२ धावांचे आव्हान पेलवले नाही. दुसरा सामना धाडसकळ गोवा विरुद्ध गोवन स्ट्रायकर्स असा झाला. गोवन स्ट्रायकर्सने इम्रान (२५) आणि साहिल वायंगणकर (१७) यांच्या जोरावर ८५ धावा केल्या. ‘धाडसकळ’कडून अमित नाईक (४०) आणि सूरज गावडे (२३) यांनी झुंजार प्रयत्न केले; मात्र त्यांचा संघ पराभूत झाला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संतोष शिरसाट यांच्यासह बबन परब, सुनील धुरी, नितीन नेमळेकर, अनिल कुलकर्णी, प्रदीप माने आदींनी विशेष परिश्रम घेतले. उमेश मांजरेकर, बंटी केरकर, मंगेश धुरी व संदीप रुद्रे यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर काका सावंत, राजा सामंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी समालोचन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.