कोकण

वैभववाडी सभापतिपदी भाजपचे रावराणे

CD

टीपः swt९२७.jpg मध्ये फोटो आंहे.
सिद्धेश रावराणे, सांची कोलते


वैभववाडी सभापतिपदी भाजपचे रावराणे

सांची कोलते उपसभापती; बिनविरोध निवडीमुळे कार्यकर्त्यांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी,ता. ९ ः येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी सिद्धेश रावराणे तर उपसभापतिपदी सांची कोलते यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
येथील पंचायत समितीच्या सहा पैकी सहा जागा जिकंत भाजपने निर्विवाद बहुमत मिळविले. त्यामुळे सभापती आणि उपसभापतिपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सभापती पदाकरिता सिद्धेश रावराणे तर उपसभापती पदाकरिता सांची कोलते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्जांची छाननी आणि इतर प्रकिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी तीन वाजता पीठासन अधिकारी तथा तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी सभापती आणि उपसभापती पदाकरिता प्रत्येकी एक एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवड जाहीर केली.
यावेळी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साधना नकाशे आदी उपस्थित होते. सभापती आणि उपसभापती निवड जाहीर करताच भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी केली. पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, दिगंबर पाटील, रितेश सुतार, नगराध्यक्ष श्रध्दा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, माजी नगराध्यक्ष नेहा रावराणे, सज्जन रावराणे, महेश संसारे आदींनी सभापती आणि उपसभापतींचे अभिनदंन केले. दरम्यान, सभापती रावराणे यांची भव्य रॅली वैभववाडी शहरातून काढण्यात आली. रावराणे हे लोरे पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी माजी सभापती लक्ष्मण रावराणे यांचा पराभव केला होता. सांची कोलते या उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.
.....................
पंचायत समिती तरुणांच्या हाती
वैभववाडी पंचायत समितीचे सूत्रे आता युवा नेतृत्वाकडे सोपविण्यात आली आहेत. सभापती रावराणे आणि उपसभापती कोलते या तरुण चेहऱ्यांकडे पक्षश्रेष्ठींनी पंचायत समितीचा कारभार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: ''पंतप्रधान मोदींच्या एका फोनमुळे युद्ध थांबू शकतं'', UAE राजदूत हुसैन मिर्झा यांनी व्यक्ती केली अपेक्षा

Jalkot News : पं. स. सभापतीपदी काँग्रेसच्या सुनिता कोसबे तर उपसभापती माधव वाघमारे यांची निवड

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स ; जाणून घ्या संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Live Update : उरुळी कांचन येथे अपघात, एकाचा मृत्यू

Udgir News : उदगीरच्या सभापतीपदी वनमाला मरलापल्ले तर उपसभापती पदी बापुसाहेब भोसले

SCROLL FOR NEXT