EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

West Bengal Election पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यात ईव्हीएमवर भाजपच्या पर्यायासमोर टेप लावल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या प्रकारावर निवडणूक आयोगानेही प्रतिक्रिया दिली आहे.
EVM Row in West Bengal Sparks Political Controversy

EVM Row in West Bengal Sparks Political Controversy

Esakal

Updated on

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. सर्वच मतदान केंद्रात मतदारांनी गर्दी केली असून मोठ्या संख्येनं मतदार बाहेर पडले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी अनुचित प्रकार घडल्याचंही समोर आलंय. डायमंड हार्बर मतदारसंघात असलेल्या फाल्टा इथं ईव्हीएमवर भाजपच्या पर्यायासमोर टेप लावल्याची तक्रार करण्यात आलीय. यावर पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी म्हटलं की, ज्या पोलिंग बूथवर कोणत्याही ईव्हीएम बटणावर टेप लावलेलं आढळलं तिथं पुन्हा मतदान होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com