29811
कणकवली सभापतिपदी हर्षदा वाळके
बिनविरोध निवड; उपसभापतीपदी सोनू सावंत
कणकवली, ता. ९ : कणकवली पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाच्या निवडी आज बिनविरोध झाल्या. सभापतीपदी नांदगाव पंचायत समिती गणातून बिनविरोध ठरलेल्या हर्षदा वाळके तर उपसभापतीपदी वरवडे पंचायत समिती गणातून बिनविरोध ठरलेले राजेश उर्फ सोनू सावंत यांची निवड झाली.
कणकवली पंचायत समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यातील १४ भाजप आणि २ शिवसेनेचे आहेत. भाजपा शिवसेना महायुतीचे असल्याने या निवडी बिनविरोधच होणार असल्याचे होते. त्यानुसार सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सभापती आणि उपसभापती पदासाठी हर्षदा वाळके आणि राजेश सावंत यांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. या निवडणुकीकरीता पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी काम पाहिले. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण सहाय्यक गट विकास अधिकारी मनोज वालावलकर विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग आदी उपस्थित होते.
दुपारी सव्वातीनला सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी जाहीर केले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, माजी सभापती दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, माजी उपसभापती महेश गुरव, संतोष कानडे, पंचायत समिती सदस्या दिव्या पेडणेकर, बबलू सावंत, राजू रावराणे, समीर प्रभुगांवकर, जिल्हा परिषद सदस्या प्राची इस्वलकर, बँक संचालक समीर सावंत, सुशील सावंत, माजी सभापती प्रकाश सावंत, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, लोरे सरपंच अजय रावराणे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब , पंढरी वायंगणकर, आयनल सरपंच श्रीमती दहिबांवकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, दामू सावंत, सुशील इंदप, कमलेश पाटील, माजी सरपंच संजय पाटील आदी उपस्थित होते. नांदगाव, असलदे, आयनल, कोळोशी, तोंडवली, बावशी तसेच वरवडे, कलमठ, आशिये, पिसेकामते आदी गावातील नागरिक अभिनंदनासाठी उपस्थित होते.
---
प्लास्टिकचा भस्मासूर रोखू ः वाळके
सभापती निवडीनंतर हर्षदा वाळके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी तालुक्यातील प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिली. याखेरीज दरवर्षी गावोगाव बंधारे उभारून भुजल पातळी वाढवणे, महिला सक्षमीकरण आदी कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.