IPL 2026, Video: तुझ्या बॅटमध्ये AI चीप आहे? वैभव सूर्यवंशीच्या उत्तरानं टीका करणाऱ्या पाकड्यांची बोलती होईल बंद

IPL 2026 Vaibhav Sooryavanshi news: पाकिस्तानमधून वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चीप असल्याचे सूर उमटले होते. आता स्वत: वैभवनेच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
Vaibhav Sooryavanshi on AI chip in Bat

Vaibhav Sooryavanshi on AI chip in Bat

Sakal

Updated on

राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षांच्या क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांनाच चकीत केलं आहे. आयपीएल २०२६ मध्ये (IPL 2026) तो दिग्गज फलंदाजांच्या खांद्याला खांदा लावून मोठमोठ्या खेळी करताना दिसतोय. त्याने अनेक अनुभवी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलेलाही दिसला.

त्याने काही दिवसांपूर्वीच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३६ चेंडूत शतक केले होते. त्यानंतर आता मंगळवारी (२८ एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध त्याने अवघ्या १६ चेंडूत ४३ धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Vaibhav Sooryavanshi on AI chip in Bat
Who is Shubham Dubey: यवतमाळच्या गल्लीतून IPL च्या मैदानापर्यंत; पान टपरी चालवणाऱ्याच्या पोराचा राजस्थान रॉयल्ससाठी धुमाकूळ
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com