कोकण

डाटा ऑपरेटर ते संगमेश्वर पंचायत समिती सभापती

CD

डाटा ऑपरेटर ते संगमेश्वरच्या सभापती
शर्वरी वेल्येंची वाटचाल; परिस्थितीवर मात करत शिक्षण
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १० ः तालुक्यातील परचुरी गावच्या शर्वरी वेल्ये यांचा डाटा ऑपरेटर ते पंचायत समिती सभापती पदापर्यंतचा प्रवास खरच प्रेरणादायी आहे. सामाजिक काम करताना मिळालेल्या राजकीय बाळकडूमुळे त्यांनी सरपंचपदावरून थेट पंचायत समिती सभापतीपदाची धुरा स्वीकारली. पुढील काळात विकासकामांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वेल्ये यांना माहेर आणि सासर अशा दोन्ही बाजूंनी राजकीय वारसा लाभला आहे. शर्वरी यांच्या जन्मापूर्वी त्यांचे आजोबा पोचरी गावचे सलग दहा वर्ष सरपंच होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांनीही दहा वर्ष पोचरी गावचे सरपंच म्हणून काम केले आणि पुढे पाच वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत होते. शर्वरी या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर कठीण प्रसंग ओढवला. आईने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही सर्व मुलांना शिक्षण देऊन सक्षम बनवले. लग्नानंतर परचुरी येथे सासरी आल्यानंतरही त्यांना राजकीय वातावरण अनुभवायला मिळाले. सासरे परशुराम वेल्ये परचुरी गावचे दहा वर्ष सरपंच होते. पुढे ते पंचायत समिती सदस्य तसेच उपसभापती पदही झाले. त्यांची राजकीय कारकीर्द शर्वरी वेल्ये यांनी जवळून पाहिली होती. याच काळात ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळावी म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीत डाटा ऑपरेटर म्हणून काम केले. त्यानंतर दोन वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. २०२१ मध्ये त्या सरपंच म्हणून निवडून आल्या. राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून त्यांनी शिवसेना पक्षात कसबा जिल्हा परिषद गटाच्या उपविभागप्रमुख म्हणूनही काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आग

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT