- rat१०p४.jpg-
P26O29934
साखरपा : चक्रभेदीच्या वैदेही सावंत यांचा सत्कार करताना पद्मश्री कल्पना सरोज आणि माजी खासदार अरविंद सावंत.
----
वैदेही सावंत यांचा मुंबईत सन्मान
जाणीव’ न्यासाचा, मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १० ः साडवली येथील ‘चक्रभेदी सोशल फाउंडेशन’च्या संस्थापक अध्यक्षा वैदेही सावंत यांना मुंबईतील ‘जाणीव’ न्यासातर्फे या वर्षीचा प्रतिष्ठित ‘मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. विधवा, निराधार आणि एकल पालक महिलांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
महानगर टेलिफोन निगम कामगार संघटनेने स्थापन केलेल्या ‘जाणीव’ न्यासाच्यावतीने जागतिक महिलादिनानिमित्त मुंबईत या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध उद्योजिका पद्मश्री कल्पना सरोज यांच्या हस्ते सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम आणि साडीचोळी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
चक्रभेदी सोशल फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील विधवा आणि निराधार महिलांसाठी काम करत आहे. समाजात विधवा महिलांबाबत असलेल्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात यासाठी संस्थेने मोठे प्रबोधन केले आहे. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जिल्ह्यात ‘शिव्यामुक्त गाव’ ही अनोखी संकल्पना ही संस्था प्रभावीपणे राबवत आहे. निराधार महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘उद्योजक स्टॉल’ उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिक बळ दिले जाते. तसेच विधवा महिलांचे मासिक पेन्शन वाढवून मिळावे यासाठीही संस्था सातत्याने शासनदरबारी प्रयत्नशील आहे.
या सोहळ्याला माजी महापौर किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, हेमांगी वरळीकर, पद्मजा चेंबूरकर, अबोली खाडे, संपदा मयेकर, सुप्रिया वळवी, ऊर्मिला पांचाळ, स्वीकृत नगरसेविका माधुरी मांजरेकर तसेच माजी खासदार अरविंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.