कोकण

सदर

CD

‘ती’ चा भवताल--------लोगो
(४ मार्च टुडे ३, फोटोसह घ्या)

‘तिला’ गृहित धरू नका

नुकताच सर्वत्र जागतिक महिलादिन उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने स्त्रीच्या विविध रूपांचा गौरव झाला, तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला; मात्र, आजही वास्तवात घरापासून दारापर्यंत स्त्रीला अनेक गोष्टींमध्ये गृहीत धरले जाते, हे खेदजनक आहे. तिला केवळ कौतुकापुरते मर्यादित न ठेवता निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेणे ही काळाची गरज आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
---
स्त्रीची विविध रूपे आपल्याला ज्ञात आहेत. नऊ महिने पोटात बाळगणाऱ्या ‘आई’च्या हाकेपासून सुरू झालेला प्रवास बहीण, मैत्रीण, प्रेयसी आणि पत्नी अशा विविध नात्यांमधून पुरुषाभोवती गुंफलेला असतो. तरीही आजही आपल्याला ‘स्त्रीमुक्ती’च्या चळवळी कराव्या लागतात, हाच एक मोठा प्रश्न आहे. जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी आणि सरोजिनी नायडू यांचा वारसा केवळ इतिहासाच्या पानांवरच का मर्यादित राहावा? आजच्या युगातील स्त्रियादेखील तितक्याच सक्षम आहेत; पण आजही त्यांना अनेक ठिकाणी गृहीत धरले जाते.
रिक्षा चालवण्यापासून ते वैमानिकापर्यंत सर्वच क्षेत्रांत महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही महिलांना महत्त्वाची पदे मिळाली असली तरी विधानसभेतील महिला सदस्यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत आजही कमीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) महिला प्रतिनिधींची नियुक्ती झाली असली तरी अनेक ठिकाणी ‘निर्णय’ घेणारा पडद्यामागील पुरुषच असतो, हे कटू सत्य आहे. परंपरांच्या नावाखाली तिचं अस्तित्व मान्य केलं जातं; पण अधिकार आणि निर्णय प्रक्रियेतील तिचा सहभाग स्वीकारताना आजही मानसिकता आडवी येते. संसारातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तिला केवळ ‘सांगितले’ जाते, तिचा ‘सल्ला’ घेतला जात नाही.
या सामाजिक प्रश्नाला दुसरी एक बाजू आहे, ती म्हणजे महिलांमधील अंतर्गत संघर्ष. अनेकदा सासू-सुनेच्या वादात गृहीत धरण्याची’ प्रवृत्ती दिसून येते. मुलावरचे आपले वर्चस्व कमी होईल की काय, या भीतीपोटी अनेकदा सुनेवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न होतो. सून ही घराचा भाग होण्यापेक्षा ती घरातील कामे करण्यासाठी आली आहे, अशा दृष्टिकोनातून तिला पाहिले जाते. यातूनच मग वादाचे भोवरे निर्माण होऊन आधुनिक काळात विभक्त कुटुंबपद्धतीचा आग्रह धरला जातो. याला केवळ मुलींना दोष देऊन चालणार नाही तर कौटुंबिक व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे.
जर समाजाला एकत्र कुटुंबपद्धती अबाधित राखायची असेल तर पती, सासू आणि सासरे या तिघांनीही एक पाऊल मागे घेऊन नव्या सुनेला आदराचे स्थान दिले पाहिजे. चौकटीबाहेर जाऊन, मानसिक बदल घडवून आणि सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतले तरच संसाराची घडी नीट बसू शकेल. ज्या स्त्रीला आपण माता-भगिनी मानतो, तिच्यावर होणारे अत्याचार ही समाजासाठी शरमेची बाब आहे. अशा वेळी आपण कोणाचे तरी भाऊ, वडील किंवा मुलगा आहोत, याचे भान विसरले जाते. सारासार विचारबुद्धी लोप पावल्यामुळे आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी नसल्यामुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत.
समाजाच्या जडणघडणीत स्त्रीचा वाटा मोलाचा आहे. तिला कोणत्याही क्षेत्रात गृहित न धरता निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आणि तिच्या विचारांचा आदर करणे म्हणजेच तिला ‘समान हक्क’ देणे होय. प्रत्येक पुरुषाने आपल्या घरापासून याची सुरुवात केली पाहिजे. घरातील प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवून तिला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले तरच खऱ्या अर्थाने महिलादिनाचा आणि तिच्या कर्तृत्वाचा सन्मान होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT