कोकण

‘कोळीण’ सादर करणाऱ्या बालकांचा मुणगेत सन्मान

CD

29939

‘कोळीण’ सादर करणाऱ्या
बालकांचा मुणगेत सन्मान

शिमगोत्सवातील कलेचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १० ः शिमगोत्सवात कोळीण वेशभूषा केलेल्या आडबंदर व कारिवणेवाडी येथील बालकलाकार हर्ष जोशी व आर्यन राणे यांचा आडबंदर कारिवणेवाडीचे पोलिसपाटील तुषार आडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत सत्कार केला.
मुणगे गावात शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रात्री देवी भगवती मंदिरामध्ये बांबरवाडी मंडळाचा तमाशा सादर करतात. याला देवीच्या मांडात ‘थाप मारणे’ म्हणतात. त्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून गावामध्ये गोमूचा नाच, तमाशा, रोंबाट घेऊन वाडीवाडीमध्ये फिरवली जातात. यामध्ये प्रामुख्याने ‘कोळीण’ (गौळणी) महत्त्वाची असते. यात पुरुषाला साडी नेसवून साज-शृंगार करून तसेच पायामध्ये घुंगरू बांधून अर्थात पूर्ण स्त्री वेश परिधान करून कोळीनीसह रोंबाट काढले जाते; मात्र आजच्या तरुण पिढीने याकडे पाठ फिरविली असताना आडबंदरवाडीतील हर्ष जोशी आणि कारिवणेवाडीतील आर्यन राणे या विद्यार्थ्यांनी कोळीण नाच सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. त्या दोघांसह ज्येष्ठ कलाकार शंकर आडकर यांना तुषार आडकर यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी आडकर यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT