कोकण

ह्यूमन राईट्सतर्फे रणरागिणींचा सन्मान

CD

swt102.jpg
29917
तळेरे ः जागतिक महिला दिनानिमित्त ह्यूमन राईट्स असोसिएशनतर्फे कर्तबगार महिलांचा गौरव करताना संघटनेचे पदाधिकारी.

ह्यूमन राईट्सतर्फे रणरागिणींचा सन्मान
तळेरेत महिला दिन ः सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १० : ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त येथील श्रावणी कॉम्प्युटरच्या प्रज्ञांगण सभागृहात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यकर्त्या श्रावणी मदभावे आणि सावी मुद्राळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व आदिशक्तींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर शिवशक्ती महिला कबड्डी संघ, बुरंबावडेच्या प्रमुख मानसी दुधवडकर, शंतनू बांदिवडेकर, ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हा खजिनदार हनिफ पिरखान आदी उपस्थित होते.
संतोष नाईक यांनी संघटनेच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली. जिल्हास्तर अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रावणी मदभावे यांचा श्री. पिरखान यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि गुलाब कलमाची कुंडी देऊन गौरविण्यात आले. सावी मुद्राळे, मानसी दुधवडकर, श्रीमती नारकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बुरंबाव़़डे कबड्डी संघाला शंतनू बांदिवडेकर यांच्या हस्ते प्रोत्साहनार्थ पाच हजार रुपये रक्कम देण्यात आली. श्रावणी मदभावे यांनी, सर्वांनी दिलेले प्रोत्साहन, पाठिंब्यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला असून तो सर्वांना समर्पित करते, असे सांगितले. सावी मुद्राळे, मानसी दुधवडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
संघटनेचे वैभववाडी तालुकाध्यक्ष प्रकाश माईणकर, अभयसिंह रावराणे, नितीन महाडिक, मंगेश सावंत, संजय खानविलकर, सतीश मदभावे, महेंद्र चव्हाण, कीर्ती आंबेरकर, प्रा. विधी मुद्राळे, बुरंबावडे पोलिसपाटील मांजरेकर आदीसह महिला उपस्थित होत्या. महेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT