कोकण

राजापूरमध्ये ८७ लाख ९० हजाराचा कर वसूल

CD

- rat१०p२.jpg-
२६O२९८६५
राजापूर नगरपालिका
-----
राजापुरात ८८ लाखांची कर वसुली
नगरपालिकेची मार्चअखेरची कसरत सुरू; चार पथकांची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १०ः मर्यादित उत्पन्नाचे स्रोत असलेल्या राजापूर नगरपालिकेचे प्रशासन करवसुलीमध्ये गुंतलेले आहे. आजपर्यंत पालिकेने १ कोटी ८० लाख ७२ हजारपैकी ८७ लाख ९० हजार रुपये वसुली केली आहे. अजूनही ९२ लाख ८२ हजार रुपयांची वसुली शिल्लक राहिली आहे. मार्चअखेर असल्याने अजूनही पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या पंधरा दिवसांमध्ये निम्मी करवसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
राजापूर ‘क’ वर्गीय नगरपालिका आहे. या पालिकेला स्वःउत्पन्नाचे मर्यादीत स्रोत आहेत. त्यामुळे पालिकेला कराद्वारे मिळणारे उत्पन्न हेच हक्काचे आहे. करदात्यांकडून करवसुली करण्यासाठी कर्मचाऱ्यांची चार पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकामध्ये पालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून, या पथकांमार्फत घरोघरी भेट देणे, फोनद्वारे थेट संपर्क साधणे, नोटीस बजावणे आदी स्वरूपाची कार्यवाही केली जात आहे; मात्र, त्यानंतरही पन्नास टक्के करवसुली करण्यामध्ये पालिकेला यश आले आहे. करांमध्ये सर्वाधिक रक्कमेचा हिस्सा असलेल्या मालमत्ता करापैकी ४९ टक्के तर पाणीपट्टी करापैकी ४३ टक्के करवसुली झाली आहे. मार्चअखेरीस शिल्लक असलेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये निम्मी म्हणजे पन्नास टक्के करवसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहीले आहे. त्यामध्ये प्रशासन कसे यशस्वी होणार? करवसुलीसाठी कोणकोणत्या क्लृप्त्या लढवणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
-------
दृष्टिक्षेपात करवसुली (लाखांत)
कराचा प्रकार* एकूण कर* वसुली* शिल्लक
मालमत्ता* ९७.३६* ४३.९* ४९.३९
वृक्ष* ४.९२* २.६* २.८६
विशेष स्वच्छता* ०.८२* ०.३१* ०.५१
घनकचरा* १०.९९* ५.५४* ५.४५
रोजगार हमी* ४.१२* २.२१* १.९१
शिक्षण* २९.१९* १५.४१* १३.७८
पाणीपट्टी* ३३.३२* १४.४* १८.९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

Mumbai Hotels Closed: मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होणार? गॅस तुटवड्यामुळे मोठा फटका, २० टक्के हॉटेल्सना टाळे

शार्दूलची तिसरी पत्नी झाल्यामुळे तुझ्यावर टीका झाली... नेहा पेंडसे थेट उत्तर देत म्हणाली- काही लोकांना वाटतं की...

Latest Marathi News Live Update : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी, एकाला अटक

SCROLL FOR NEXT