कोकण

सावर्डेत समाधान शिबिराचा शुभारंभ

CD

- ratchl९२.jpg-
P२६O२९७६०
चिपळूण ः अभियानात दाखल्यांचे वितरण करताना आमदार शेखर निकम
-----
सावर्डेत समाधान शिबिराचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० ः तालुक्यातील ग्रामस्थांना दर्जेदार शासकीय सेवा मिळण्यासाठी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येत आहे. तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायतीत आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यानिमित्ताने शेकडो दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या शिबिरात ग्रामस्थांना विविध महसुली दाखले व शासकीय योजनांचा लाभ थेट देण्यात आला. त्यामध्ये सातबारा उतारे- ५१७, ‘८ - अ’ उतारे- २८७, मंजूर फेरफार - ५९, तर जाती, नॉन-क्रीमी लेयर, उत्पन्न, वय, अधिवास, राष्ट्रीयत्व आदी दाखले- ३२४ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. आधार अपडेट २४, तुकडेबंदी नियमितीकरण फेरफार ३०, अकृषिक परवानगीतील कमी-जास्त पत्रक प्रकरणे १२ आणि सातबारा दुरुस्ती संदर्भातील अर्ज ३२ स्वीकारण्यात आले. याशिवाय संजय गांधी योजनेअंतर्गत २३ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. पुरवठा विभागाकडून नाव कमी करणे ५२, नाव वाढविणे- ६६, आणि २४ नवीन अंत्योदय शिधापत्रिका देण्यात आल्या. निवडणूक विभागाकडून नमुना ६ चे २, नमुना ७ चे १७ आणि नमुना ८ चे १८ अर्ज स्वीकारण्यात आले. कृषी विभागामार्फत महाविस्तार ॲप नोंदणी २२, ॲग्रीस्ट्रॅक नोंदणी २९, पीएम किसान १६ व महा-डीबीटीचा १ अर्ज करण्यात आला. तसेच आयुष्यमान भारत कार्डासाठी ३३ लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यात आली. पंचायत समितीकडून जन्म दाखले २२, विवाह प्रमाणपत्रे १२, असेसमेंट उतारे २० तसेच ९ जणांना घरकुल लाभ देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींचं आव्हान श्याम मानव यांनी स्वीकारलं; पण 'या' मुद्द्यावरुन एकमत होईना

Shaktipith Highway : ​‘शक्तिपीठ’ महामार्गाचा धनदांडग्यांनाच फायदा, शेतकऱ्यांचे मात्र 'पीठ' होणार; नव्या आरेखनाविरोधात शेतकरी आक्रमक

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

Electricity Bill Saving Tips : हवं तेवढं वापरा फॅन, एसी, फ्रीज! पण वीजबिल येणार निम्मं; वापरुन पाहा 'ही' एकदम सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT