जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

LPG Gas Ship in Jaigad ओमानवरून एलपीजी गॅस घेऊन हे आमीर गॅस मालवाहू जहाज निघाले होते. या जहाजाचे दोन मालक आहेत. एक मालक हे जहाज पाकिस्तानला नेण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरा मालक भारताला गॅस देण्यास आग्रही आहेत.
Two Owners One Vessel Gas Shipment Stuck in Decision Conflict

Two Owners One Vessel Gas Shipment Stuck in Decision Conflict

Esakal

Updated on

जयगड बंदरात थांबविण्यात आलेल्या आमीर गॅस या मालवाहू जहाजाची चौकशी सीमा शुल्क विभागाकडून (कस्टम) पूर्ण झाली आहे. त्याबाबतचा अहवाल आता कस्टम आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. या जहाजाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार आहे. त्यामुळे १८०० टन एलपीजी गॅसचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ते जहाज जेएसडब्ल्यू बंदरात आणण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com