उल्लास साक्षरता परीक्षा १५ मार्चपासून
कृष्णकुमार पाटीलः जवळच्या परीक्षा केंद्रावर आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास: नवभारत साक्षरता कार्यक्रमा’तंर्गत १५ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील असाक्षरांसाठी १५ मार्च रोजी साक्षरता परीक्षेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत निरक्षरांनी आपल्या जवळच्या परीक्षा केंद्रावर (शाळेत) उपस्थित राहून या परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
केवळ वाचन आणि लेखनच नव्हे, तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे हा आहे. या चाचणीमुळे नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक ज्ञान, डिजिटल साक्षरता, आरोग्य जागरूकता, आपत्ती व्यवस्थापन आणि बालसंगोपन यांसारखी महत्त्वाची जीवनकौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.
ही परीक्षा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल. प्रत्यक्ष पेपर ३ तासांचा असेल तर दिव्यांग व्यक्तींसाठी ६० मिनिटे जादा वेळ दिला आहे. एकूण १५० गुणांची परीक्षा असून त्यात वाचन ५० गुण, लेखन ५० गुण आणि संख्याज्ञान ५० गुण असे तीन भाग असतील. उत्तीर्णसाठी प्रत्येक भागात किमान ३३ टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड अशा विविध भाषांतून परीक्षा देता येणार आहे. ज्यांनी अद्याप उल्लास अॅपवर ऑनलाईन नोंदणी केलेली नाही, त्यांना परीक्षेच्या दिवशीही नोंदणी करून चाचणी देता येईल.
ही चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून अधिकृत प्रमाणपत्र व गुणपत्रक प्रदान करण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या परीक्षेला उपस्थित राहावे, यासाठी स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
चौकट
शाळा हेच परीक्षा केंद्र
यु-डायस (U-DISE) क्रमांकानुसार नोंदणी केलेली प्रत्येक शाळा हे परीक्षा केंद्र असणार आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्या कार्यरत आहेत. शाळास्तरावर मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर या परीक्षेची मुख्य जबाबदारी सोपवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.