पणजी येथे १८ मार्चला ‘डाक अदालत’
रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालयातर्फे १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता क्षेत्रीय स्तरावरील ‘६५ व्या डाक अदालत’चे आयोजन करण्यात आले आहे. पणजी येथील पोस्टमास्तर जनरल कार्यालयात ही अदालत पार पडणार असून, यामध्ये टपाल विभागाशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.
ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल किंवा ज्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशाच तक्रारींची दखल या डाक अदालतमध्ये घेतली जाणार आहे. तक्रारदारांनी आपल्या अर्जात तक्रारीचा सर्व तपशील देणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ तक्रार पाठवलेली तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव आणि पत्ता यांचा उल्लेख असावा. आपली तक्रार अतिरिक्त प्रतीसह १२ मार्च २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. या मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. टपाल खाते हे सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सेवा देताना काही तांत्रिक त्रुटींमुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता असते. अशा वेळी ग्राहकांना थेट महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना भेटून आपली बाजू मांडता यावी आणि प्रलंबित प्रश्न निकाली निघावेत, या उद्देशाने या अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
माने अभियांत्रिकी महाविद्यालयात
‘जागतिक महिला दिन’ उत्साहात
देवरुख : आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महिला डेव्हलपमेंट सेलच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य, वेळेचे नियोजन आणि सक्षमीकरण या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, मानेज इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजर सौ. ईशानी वाघ-माने, प्रमुख अतिथी डॉ. कविता फासके आणि प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी महिला डेव्हलपमेंट सेलच्या प्रमुख प्रा. पूनम क्षीरसागर यांनी कार्यक्रमाची रूपरेखा मांडली.
सौ. नेहा माने यांनी दैनंदिन जीवनातील वेळेचे नियोजन, मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. कविता फासके यांनी रोजच्या आहाराचे महत्त्व आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास किती गरजेचा आहे, याची विस्तृत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थिनींना काही योगासनांची प्रात्यक्षिकेही करून दाखविली. तसेच प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.