कोकण

पाककला स्पर्धेत अपर्णा पास्ते, सुप्रिया आठल्ये प्रथम

CD

rat१०p१४.jpg-

रत्नागिरी : कुवारबाव ब्राह्मण पंचक्रोशी सभा आयोजित पाककला स्पर्धेतील विजेत्यांसमवेत मान्यवर.
----
पाककला स्पर्धेत पास्ते, आठल्ये प्रथम
कुवारबाव ब्राह्मण पंचक्रोशी सभा ; महिलांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात पौष्टिक पराठा बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक अपर्णा पास्ते, द्वितीय प्रज्ञा फडके, तृतीय रोहिणी गुण्ये यांनी आणि उत्तेजनार्थ मिहिका कार्लेकर यांनी यश मिळवले. तर रव्याचे पाकतील लाडू बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम सुप्रिया आठल्ये, द्वितीय सुप्रिया पाटणकर, तृतीय स्पृहा आठल्ये व उत्तेजनार्थ रोहिणी गुण्ये यांनी क्रमांक मिळवले.
नाचणे येथील गोखले भवन येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही गटात ६५ स्पर्धक महिला सहभागी झाल्या. स्पर्धेत चिपळूण, पूर्णगड व रत्नागिरीतील स्पर्धक सहभागी झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने अदिती भावे यांनी केली. अर्चना जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दीपप्रज्वलन रवींद्र रानडे, श्री. गानू, अनुजा आगाशे व परीक्षक शीतल पटवर्धन आणि ऋता पंडित यांनी केले. वर्मोर सोल्युशन्स कंपनीच्या उत्पादनांची माहिती सेजल व स्वरश्री जोगळेकर यांनी दिली. सर्व स्पर्धकांना संस्थेकडून सहभागाबद्दल भेटवस्तू देण्यात आली. परीक्षकांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. स्पर्धकांना परीक्षकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शमा प्रभुदेसाई यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनंत आगाशे, रवींद्र रानडे, श्री. गानू, तेजा मुळ्ये, देवदत्त पेंडसे यांचे सहकार्य लाभले. अनुजा आगाशे, राधा रानडे, श्रेया रानडे, अर्चना जोशी, मानसी अभ्यंकर, पूर्वा साने, श्रद्धा पटवर्धन, उर्मिला पटवर्धन, शमा प्रभुदेसाई यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT