कोकण

उखाणे, संगीत खुर्ची स्पर्धेतून धाकोरेत महिलांना व्यासपीठ

CD

30001

उखाणे, संगीत खुर्ची स्पर्धेतून
धाकोरेत महिलांना व्यासपीठ

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १० ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून धाकोरे शाळा क्र. १ येथे विविध स्पर्धा व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
धाकोरे गावच्या स्नेहा मुळीक, बचतगटाच्या सीआरपी श्रीमती प्रभुराळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार, धाकोरे गावचे पोलिसपाटील श्रीराम प्रभुराळकर, उपाध्यक्ष रवींद्र मुळीक उपस्थित होते. शाळेच्या शिक्षिका प्रेरणा गोवेकर यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. पोलिसपाटील श्रीराम प्रभुराळकर यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली. महिलांसाठी उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, रस्सीखेच व इतर फनी गेम्स अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर तळणकर, प्रेरणा गोवेकर व सहाय्यक शिक्षक सोनल जाधव यांच्या सहकार्याने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्या IAS अधिकाऱ्यासाठी ममतांनी PM मोदींचा आदेश धुडकावला, TMC हरताच दिला राजीनामा

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

Maharashtra Female Foeticide Monitoring: कन्याभ्रूण हत्येवर लगाम : राज्य तपासणी व संनियंत्रण समितीवर आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची नियुक्ती

Pune Parvati Crime : पर्वतीतील नऊ वर्षीय मुलीवरीरील अत्याचारप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Maharashtra NPS Reform: राज्य शासनाचा मोठा निर्णय: सुधारित एनपीएसमुळे शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना हमी निवृत्तीवेतन

SCROLL FOR NEXT