कोकण

सावंतवाडी येथे शुक्रवारी ‘नारी अभ्युदय महोत्सव’

CD

सावंतवाडी येथे शुक्रवारी
‘नारी अभ्युदय महोत्सव’

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस’ या संस्थेच्यावतीने ‘नारी अभ्युदय महोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी ५ वाजता येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. ​या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव केला जाणार आहे. नवनिर्वाचित पंचायत समिती व जिल्हा परिषद महिला सदस्यांचा विशेष सन्मान तसेच इतर सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येईल. महिलांसाठी पारंपरिक ‘हळदी-कुंकू’ समारंभ, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सौभाग्य संध्या’ हा विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला जाईल. या महोत्सवास सावंतवाडी आणि परिसरातील महिलांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT