जामसंडेत रिक्षा उलटून
चालक, प्रवासी जखमी
देवगड, ता. १० : जामसंडे परिसरात रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालकासह आतील काही प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महिलांचा सहभाग होता. अपघाताची ही घटना जामसंडे-पडेल मार्गावर आज दुपारी जामसंडे परिसरात घडली. रिक्षा पडेलच्या दिशेने जात असताना एका वळणरस्त्यावर अपघात घडला. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.