- rat११p२.jpg-
२६O३०१२६
चिपळूण ः येथे महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रातर्फे आयोजित महिलादिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर शेजारी मान्यवर.
-----
कौशल्य विकास कार्यक्रमातून महिलांना बळ
रूपाली दांडेकर ः कामगार कल्याण मंडळातर्फे महिलांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ : ‘चिपळूण पालिकेच्या हद्दीतील कामगारांची मुले आणि महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांचा निश्चितच उपयोग होईल. यासाठी नगरपालिका प्रशासन मंडळाला सर्वतोपरी मदत करेल,’ असे प्रतिपादन उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर यांनी केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय चिपळूण येथे मंगळवारी (ता. १०) जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये तृप्ती हिरवे (जे. के. तालाबो कंपनी), सुषमा करंदीकर (चिपळूण एसटी आगार), सुवर्णा पाटील (युएसव्ही कंपनी), छाया पोटे (महाजेनको), रसिका काजारी (जे. के. फाईल्स), संजीवनी मोरे (पी अँड पी कॉन्ट्रॅक्टर्स), प्राजक्ता टकले व रेखा भुवड (हिंदुस्थान युनिलिव्हर) यांचा समावेश आहे.
या प्रसंगी दांडेकर म्हणाल्या, ‘कामगारांना केंद्रबिंदू मानून मंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या योजना त्यांना आर्थिक दिलासा देण्यासोबतच सामाजिक सन्मानही मिळवून देत आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे.’ जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम म्हणाल्या, ‘कामगारांच्या हितासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमीच सहकार्याची भूमिका घेऊ. मंडळाच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.’
या कार्यक्रमात परशुराम हॉस्पिटलच्यावतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच चिपळूण तालुका आजी-माजी सैनिक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आरोग्यदायी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रभारी कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र निकम यांनी प्रास्ताविक केले. जयश्री यादव यांनी सूत्रसंचालन केले तर ज्योती गाडे यांनी आभार मानले.
------
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस सतर्क
चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांनी कौटुंबिक जबाबदारीत महिलांचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांची सुरक्षा आणि सन्मानासाठी पोलिस खाते सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.