कोकण

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात वाचन कक्ष

CD

‘आठल्ये’महाविद्यालयात वाचनकक्ष
भोसलेंनी कुटुंबीयांची मदत; अभ्यासासाठी पूरक सुविधा
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ११ ः येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भोसले कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून सुसज्ज असा ‘स्व. ललिता सावळाराम भोसले वाचनकक्ष’उभारण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसंगत आणि एकाग्रतेस पूरक अशी सुविधा उपलब्ध झाली आहे.
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले व कीर्ती भोसले यांनी या वाचनकक्षासाठी देणगी देऊन या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. तसेच उर्वरित आवश्यक आर्थिक साहाय्य देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने स्वतः उचलून या वाचनकक्षाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले. या कक्षाला ‘स्व. ललिता सावळाराम भोसले वाचनकक्ष’असे नाव देऊन एका पवित्र स्मृतीला ज्ञानाच्या कार्याशी जोडण्यात आले आहे. नूतन वाचनकक्षाचे उद्‍घाटन कृष्णकुमार भोसले यांच्या मातोश्री अलका भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कृष्णकुमार भोसले यांचे बंधू प्राचार्य डॉ. शशिकांत चौधरी हे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान कृष्णकुमार भोसले यांनी परिवारातर्फे संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत, कार्यवाह शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर तसेच ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांचा सत्कार केला.
या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष भोसले यांनी सांगितले, ‘या वाचनकक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, हीच आमची भावना आहे. भविष्यातही या कक्षाला अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची आमची तयारी राहील,’ असे आश्वासनही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT