कोकण

सातोसे येथे नारीशक्तीचा जागर

CD

30165

सातोसे येथे नारीशक्तीचा जागर

विविध स्पर्धांना प्रतिसाद; आर्वी धुरी पैठणीच्या मानकरी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातोसे येथे महिला ग्रुप व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेळ पैठणीचा-सन्मान नारीशक्तीचा’ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, उपसरपंच रुपेश साळगावकर, माजी सरपंच मदन सातोसकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत धुरी, ग्रामपंचायत सदस्या शुभदा गवंडी, संपदा धुरी, मुख्याध्यापिका सीमा पंडित, विविध बक्षिसांचे पुरस्कर्ते भरत पेडणेकर, चिरायू मांजरेकर व वीणा बर्डे उपस्थित होत्या.
महिलांच्या सन्मानासाठी, तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभाग नोंदवून कार्यक्रमाला रंगत आणली.
या स्पर्धेत आर्वी धुरी यांनी प्रथम क्रमांक, तर शामल नागवेकर आणि तनुजा गडेकर यांनी उपविजेतेपद पटकावले. विजेत्या-उपविजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी साड्या देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे होण्यासाठी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, तसेच सातोसे क्र. १ शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पंडित यांनी सहकार्य केले. जे. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
‘महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून अशा उपक्रमांमुळे त्यांना अधिक प्रेरणा मिळते,’ असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रतीक्षा मांजरेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिला मंडळ, बचतगट व ग्रामस्थ तसेच सूत्रसंचालक प्रसाद मांजरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

Gas Cylinder Shortage : कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT