कोकण

कबड्डीत ''जामसंडे पंचक्रोशी'' विजेता

CD

swt111.jpg
30164
कोळोशी ः सिंधू चषक कबड्डी स्पर्धेत विजेत्यांना व उपविजेत्यांना गौरविताना मान्यवर.

कबड्डीत ‘जामसंडे पंचक्रोशी’ विजेता
‘सिंधू चषक’ स्पर्धा ः कोळोशी सिंधुपुत्र प्रतिष्ठान उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ११ ः सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशी आयोजित सिंधू चषक २०२६ कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधुपुत्र कोळोशी संघाला पराभूत करत जामसंडे पंचक्रोशी संघाने विजेतेपद पटकावत ‘सिंधू चषक’ उंचावला. या स्पर्धेत मिळालेली बक्षिसाची रक्कम जामसंडे संघाने असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाला देणगी घोषित करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या सिंधू चषक २०२६ चा उद्‍घाटन सोहळा भाजप कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर व जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. स्पर्धेची नाणेफेक जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, पंचायत समिती सदस्य अण्णा खाड्ये यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर, माजी सरपंच सुशील इंदप, सुचिता पोकळे, पंढरी वायंगणकर, संजय गोरुले, विद्याधर खोत, उत्तम सावंत, नामदेव इस्वलकर, राजा साटम, सुयोग पोकळे, दीपक चव्हाण, विशाल कदम, विशाल पारकर उपस्थित होते.
अंतिम फेरीत पंचक्रोशी जामसंडे विरुद्ध सिंधुपुत्र प्रतिष्ठापन कोळोशी सामना झाला. या सामन्यात जामसंडे पंचक्रोशी संघाने सांघिक खेळाच्या जोरावर विजेतेपद पटकावले. कोळोशी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय यंगस्टार कणकवली तर चतुर्थ लक्ष्मीनारायण वालावल ठरले. विजेत्यांस अनुक्रमे रोख रक्कम २०००, ७०००, २५००, २५०० व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट चढाई-ऋषी राणे, पकड-आकाश पाटकर, अष्टपैलू खेळाडू पंकज सांगळे यांना रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू नामदेव इस्वलकर पुरस्कृत ‘पब्लिक हिरो’ आनंद परब ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT