swt112.jpg
30166
शिडवणे ः स्वानंदी कुबल हिचा सत्कार करताना मुख्याध्यापक प्रवीण कुबल आणि इतर शिक्षक.
शिडवणे क्रमांक १ शाळेत
स्वानंदी कुबलचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ११ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे क्र. १ या शाळेमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या परिपाठाच्या वेळेत आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थिनी स्वानंदी कुबल हिने आपल्या अष्टपैलू कलाकौशल्यांचे बहारदार सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वानंदीने नृत्य, नाट्य, गायन आणि वक्तृत्व अशा विविध पाच कलाप्रकारांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने ‘नटरंग’ या विषयावर आधारित कथ्थक नृत्य सादर करून तिने शास्त्रीय नृत्यातील आपली चमक दाखवली. त्यानंतर ‘मराठी भाषा हरवली-सापडली’ या विषयावर एकपात्री प्रयोग सादर करत भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. गायन क्षेत्रातही तिने आपली चुणूक दाखवत ‘साऊ पेटती मशाल’ हे गीत आणि ‘प्रतापगडावरील पराक्रम’ हा वीररसपूर्ण पोवाडा सादर करून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. शेवटी ‘मी देशासाठी काय करेन?’ या विषयावर प्रभावी वक्तृत्व सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली. आपल्या कलागुणांतून स्त्रीशक्तीचा जागर केल्याबद्दल शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून तिचे विशेष कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.