swt113.jpg
30228आरोस ः उद्योजिका संगीता पांचाळ यांचे स्वागत करताना मुख्याध्यापक अनिल नाईक, देवयानी चव्हाण व इतर.
आरोस विद्या विकास
प्रशाळेत महिला दिन
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ११ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या खास कार्यक्रमासाठी आरोस दांडेली ( कोंडुरे तिठा) येथील महिला उद्योजक संगीता पांचाळ यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. प्रशालेच्या वतीने पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी समाजातील विविध क्षेत्रातील महिलांच्या जीवनावर गौरवपर भाषण केली. शिक्षिका देवयानी चव्हाण व विद्यार्थ्यांनी पांचाळ यांची खास मुलाखत घेऊन त्यांचा जीवनातील प्रवास जाणून घेतला. यावेळी पांचाळ यांनी आपल्या जीवनातील चढउतार कथन करत उपस्थितांना जीवनात कुठल्याही संकटाला न घाबरता मोठ्या धैर्याने संकटांना सामोरे जायला हवे, असे सांगितले. यावेळी मिताली नाईक, कृपा नेमळेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन देवयानी चव्हाण यांनी केले. मुख्याध्यापक अनिल नाईक यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.