कोकण

मैदानी खेळ निरोगी आयुष्याचा मूलमंत्र

CD

swt1111.jpg
30175
सिंधुदुर्गनगरी : क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनरप्रसंगी जिल्हाधिकारी धोडमिसे, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, प्रभाकर सावंत व इतर मान्यवर.

मैदानी खेळ निरोगी आयुष्याचा मूलमंत्र
तृप्ती धोडमिसे ः सिंधुदुर्गनगरीत मुख्यालय पत्रकार संघातर्फे क्रिकेट स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः सुकर जीवनासाठी निरोगी आयुष्य महत्त्वाचे असते. निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. हा व्यायाम मैदानावरील खेळातून मिळतो. त्यामुळे नियमित खेळणे महत्त्वाचे आहे. त्याच उद्देशाने मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांसाठीच्या क्रिकेट स्पर्धा हा उपक्रम निश्चितच बोध घ्यायला लावणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानावर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आज क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, पत्रकारांचे राज्य प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा सचिव बाळ खडपकर, जिल्हा प्रतिनिधी संजय वालावलकर, राजन नाईक, मुख्यालय अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, सचिव दत्तप्रसाद वालावलकर, खजिनदार गिरीश परब, कुडाळ अध्यक्ष विजय पालकर, तेजस्वी काळसेकर, सतीश हरमलकर, संदीप गावडे, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, मनोज वारंग, विनोद परब उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक दहिकर यांनी, पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हे आपण पहिल्यांदा पाहत आहोत. पत्रकार हे नेहमीच फटकेबाजी करीत असतात, परंतु आजचे सामने त्यांच्या-त्यांच्यातच आहेत. बॉल आणि बॅट मधील हा संघर्ष मैदानावर दिसणार आहे, असे सांगत क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. प्रभाकर सावंत यांनी, पत्रकार आणि आपले स्नेहाचे सबंध आहेत. समाज विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा प्रभाव निश्चितच आहे, असे सांगत स्पर्धेला दिल्या.

चौकट
बोध घ्यावा अशी स्पर्धा
स्पर्धा सुरू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी स्पर्धेला भेट दिली. यावेळी शुभेच्छा देताना त्यांनी पत्रकारांची ही क्रिकेट स्पर्धा प्रशासनाने बोध घ्यावी, अशी आहे. पत्रकारांना विरंगुळा मिळावा आणि त्यांच्यातील क्रिकेट खेळाला व्यासपीठ मिळावे, यासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा कौतुकास पात्र आहे, असे सांगत ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT