rat११p८.jpg-
P२६O३०१७७
पालघरवाडी : सम्राट बळीराजा पूजन करताना पालघरवाडी गणेशोत्सव मंडळ.
पालघरवाडी येथे बळीराजा पूजन
गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम; परंपरेला नवविचारांची जोड
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ११ : तालुक्यातील पालघरवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक प्रबोधनाचा नवा आदर्श घालत परिवर्तनवादी विचारांची झेप घेतली आहे. दरवर्षी वैचारिक देखाव्यांतून समाजजागृती करणाऱ्या या मंडळाने यंदा ५ मार्च रोजी संत तुकाराम महाराज बीजनिमित्त पारंपरिक पूजेऐवजी ‘सम्राट बळीराजा पूजन’ हा नवविचार मांडणारा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यापूर्वीही सत्यशोधक पद्धतीने फोटोपूजन, उत्तरकार्य आणि गृहप्रवेशासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. याच परंपरेला अनुसरून यंदाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या या वैचारिक भूमिकेचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, पंचायत समितीचे उपसभापती दीपक मालुसरे, सदस्य अनिल रटाटे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन महामुणकर यांसह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रदीप कांबळे, गणेश तांबिटकर आणि भारती कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सत्यशोधक शिवप्रवर्तक समितीचे अधिकृत संस्कारकर्ते अशोक बैकर आणि जयेंद्र दुसार यांनी या कार्यक्रमाचा विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडला.
----
विद्यार्थ्यांचा गौरव
या निमित्ताने सायंकाळी गावातील यशस्वी व होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव ग्रामीण व मुंबई मंडळ, महिला मंडळ आणि बाळगोपाळ मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.