कोकण

देवरुखमध्ये गॅस सिलिंडरसाठी रांगा

CD

rat11p1.jpg
30125
देवरूखः शहरातील संजीवन इंडिया गॅसमध्ये सिलिंडरसाठी ग्राहकांनी केलेली गर्दी.

देवरूखमध्ये गॅस सिलिंडरसाठी रांग
गृहिणींची कसरत; बुकिंगवर २१ दिवसांची मर्यादा
सकाळ वृत्तसेवा
​देवरूख, ता. ११ ः आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता देवरूखमधील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्याची भीती आणि वाढत्या दरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. देवरूखमधील गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगा लागल्या आहेत. तसेच गॅस कंपन्यांनी बुकिंगवर २१ दिवसांची मर्यादा घातल्यामुळे ग्राहकांमधील संभ्रमात अधिकच भर पडली आहे.
​युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाई भासण्याची शक्यता असल्याने अनेकांकडून सिलिंडरची साठवणूक केली जात असल्याची शक्यता आहे. यावर संगमेश्वर तालुका पुरवठा विभागाचे लक्ष राहणार आहे. कोणत्याही एजन्सीकडे अतिरिक्त साठा आढळल्यास कडक कारवाईचा इशाराही दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली असून, एका सिलिंडरनंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी २१ दिवस थांबावे लागत आहे. छोटे कुटुंब असले तर त्यांना याची झळ बसत नाही; मात्र मोठे कुटुंब असल्यास त्यांना कसरत करावी लागणार आहे.

कोट १
एका बाजूला महागाई वाढतेय आणि दुसरीकडे आता बुकिंगवरही निर्बंध आले आहेत. आमचे कुटुंब मोठे असल्याने २१ दिवसांची मर्यादा खूप जाचक आहे. अचानक गॅस संपला तर काय करायचे, हा प्रश्न पडला आहे. सरकारने किमान जीवनावश्यक वस्तूंबाबत तरी दिलासा द्यायला हवा.
- रूपाली गोताड, गृहिणी, देवरूख

कोट २
गॅसचे दर एकदम ६० रुपयांनी वाढल्यामुळे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. युद्धाचे कारण सांगून सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असताना आता गॅससाठी रांगा लावण्याची वेळ येणे, हे दुर्दैवी आहे.
- अनिता चौघुले, गृहिणी, निवे बु. ता. संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

SCROLL FOR NEXT