कोकण

वेंगुर्ले येथे सोमवारी विशेष स्क्रिनिंग कॅम्प

CD

वेंगुर्ले येथे सोमवारी
विशेष स्क्रिनिंग कॅम्प
वेंगुर्ले ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी २४ मार्चला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी योग्यप्रकारे तपासणी होऊन त्या-त्या स्पेशालिटीचे रुग्ण संदर्भित करता यावेत, यासाठी सोमवारी (ता. १६) येथील उपजिल्हा रुग्णालय येथे विशेष स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन केले आहे. यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील हृदयरोग, ग्रंथीरोग, स्त्रीरोग, कर्करोग, पोटाचे विकार, अस्थिरोग, मूत्ररोग या रोगांसाठी स्क्रिनिंग करून या रुग्णांना मंगळवारी (ता. २४) सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्पसाठी संदर्भित करण्यात येणार आहे. स्क्रिनिंग कॅम्पकरिता वेंगुर्ले तालुका कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व शहरी भागातील हृदयरोग, ग्रंथिरोग, स्त्रीरोग, कर्करोग, पोटाचे विकार, अस्थिरोग, मूत्ररोग रुग्णांना सोमवारी (ता. १६) वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी केले आहे.
......................
नागवे खेडेकरवाडीत
मांड उत्सव उत्साहात
कणकवली ः नागवे येथील श्री मांडाधिकारी विकास मंडळ खेडेकरवाडी येथे या वर्षी मांड उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यामध्ये घुमट वाद्ये आणि नाच, गौळणी, सोंगे नाट्यछटा अशी भरगच्च मनोरंजनाची मांदियाळी होती. गेली पंचवीस वर्षे या मांडावर होळी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. होळीपासून धुळवडीपर्यंत आणि गुढीपाडव्या दिवशी या मांडावर तमाशा साजरा केला जातो. याही वर्षी हा मांड उत्सव उत्साहात पार पडला आणि शेवटी रंग उधळून या कार्यक्रमाची सांगता झाली. गुढीपाडव्यानिमित्त होणार्‍या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विरल नांदगावकर, उपाध्यक्ष सावळाराम खेडेकर, सचिव दीपक वर्देकर, कार्याध्यक्ष धाकू नांदगावकर व खजिनदार कृष्णा खेडेकर यांनी श्री मांडाधिकारी विकास मंडळाच्या वतीने केले आहे.
---
कुडाळात आज
‘कालगती संग्राम’
कुडाळ ः गांधीचौक मित्रमंडळाच्यावतीने येथील गांधीचौक येथे उद्या (ता. १२) रात्री १० वाजता नाईक-मोचेमाडकर दशावतार, मंडळ (मोचेमाड-वेंगुर्ले) यांचे ‘कालगती संग्राम’ नाटक होणार आहे. सकाळी तेथील श्री देव कोटेश्वर मंदिरात सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ४ वाजल्यापासून भजनांचा कार्यक्रम व रात्री १० वाजता दशावतार नाटक सुरू होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
.........................
कणकवलीत आज
आरोग्य चिकित्सा
कणकवली ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कणकवली नगरपंचायत, नगरपंचायत महिला व बालकल्याण विभाग, कनकसिंधू शहरस्तर संघ, कणकवली सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. १२) हे रक्तदान शिबिर होणार आहे. कणकवली नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृह येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले आहे.
.........................
सातार्ड्यात आजपासून
राष्ट्रोळी वर्धापन दिन
सावंतवाडी ः सातार्डा-वरचावाडा येथील श्री राष्ट्रोळी देवाचा वर्धापन दिन सोहळा १२ व १३ ला साजरा होत आहे. उद्या (ता. १२) सकाळी १० वाजता लघुरुद्र, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता राष्ट्रोळी रंगमंच येथे खानोलकर दशावतार मंडळाचा ‘असुरमर्दिनी पुण्याक्षी’ नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच शुक्रवारी (ता. १३) सकाळी १०.३० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता राष्ट्रोळी रंगमंच येथे जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित रहाण्याचे आवाहन गोवेकर बंधू व वरचावाडा ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT