कोकण

अंशतः अनुदानित शिक्षकांना पेन्शन लागू करा

CD

अंशतः अनुदानित शिक्षक आक्रमक
सन्मान निवृत्तिवेतन योजना लागू करा; मुंबईत सोमवारपासून आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्तिवेतन योजना लागू करा, अशी मागणी राज्यातील शिक्षक समन्वय संघाने केली आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाकडून १६ व १७ मार्चला मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी हजारो शिक्षक आझाद मैदानावर येणार आहेत.
२००१ पासून राज्यात विनाअनुदानित धोरण लागू झाले. २००१ पासून, विनावेतनाची, विनाअनुदानितची सुमारे २० वर्षे व अलीकडील अंशतः अनुदानितकडील ५ ते ६ वर्षे अशी यामुळे राज्यातील सुमारे ६५ हजार शिक्षक बेजार झाले आहे. सेवेत असताना फारसं काही मिळालं नाही आणि निवृत्तीनंतरही काहीच नाही. यामुळे धर्मसंकटात सापडलेल्या अंशतः अनुदानित शिक्षकांनी निवृत्तीनंतर किमान पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी केली आहे.
अंशतः अनुदानित शिक्षकांची डीसीपीएस, एनपीएसची खाती अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत; पण अंशतः अनुदान सुरू करताना व प्रत्येक वाढीव टप्पा देताना सदर योजनांमध्ये सामील होऊ, असे शिक्षकांकडून हमीपत्र घेण्यात आले होते; परंतु यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. निवृत्तीनंतर अंशतः अनुदानित शिक्षकांना आपल्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी नव्या संधी व नोकऱ्या कराव्या लागत आहेत.
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या लेखाशीर्षकांचे पगारदेखील वेळेत होत नसल्याने हा देखील विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे शिवाय १ ऑगस्ट २०२६ पासून अंशतः अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना, वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा द्या, अशी मागणी होत आहे तसेच ऑगस्ट, सप्टेंबर २०२५ या महिन्यांचे वाढीव टप्प्याने थकीत असलेले वेतन अदा करा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT