30251
बांद्यातील श्रीराम चौक परिसर
भाजप, प्रशासनातर्फे स्वच्छ
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः शहरातील उड्डाणपुलाखालील श्रीराम चौक परिसरात स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने भाजप व बांदा शहर ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मोहिमेदरम्यान उड्डाणपुलाखाली साचलेला कचरा, प्लास्टिक तसेच अन्य घनकचरा साफ करण्यात आला. कचरा योग्य ठिकाणी जमा करून त्याची विल्हेवाट लावली. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि स्वच्छ भारत अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच आबा धारगळकर, जावेद खतीब, बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, दिलीप बांदेकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, कैलास गवस, शैलेश नाईक आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.