कोकण

आंबा, काजू बागायतदारांना तातडीने नुकसान भरपाई द्या

CD

30259

आंबा, काजू बागायतदारांना
तातडीने नुकसान भरपाई द्या

अरविंद मोंडकर ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजू या प्रमुख हंगामी पिकांचा मोहोर मोठ्या प्रमाणावर काळवंडून गळून पडला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालवण, वेंगुर्ले, देवगड यांसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत यंदा मोहोराची स्थिती बिकट आहे. अनेक वर्षांनंतर प्रथमच इतक्या भीषण स्वरुपात हवामानाचा फटका बसला आहे. आंबा-काजू पिकांसाठी बागायतदारांनी घेतलेली मेहनत, खते, कीटकनाशक फवारणीसाठी घेतलेली कर्जे आणि मजुरीचा खर्च पाहता, हाताशी आलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
निवेदनात मोंडकर यांनी स्पष्ट केले आहे, की तहसीलदार आणि तलाठ्यांना तात्काळ ‘स्पॉट पंचनाम्या’चे आदेश देऊन आठवडाभरात अहवाल सादर करावा. येणाऱ्या गुढीपाडव्यापूर्वी बागायतदारांना मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर राज्य सरकार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध म्हणून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खराब झालेल्या मोहोराची माळ लावून अनोखे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. बागायतदारांनी वर्षभर रक्ताचे पाणी करून बागा जोपासल्या, पण निसर्गाच्या लहरीपणामुळे आज तो हतबल झाला आहे. प्रशासनाने आता कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही श्री. मोंडकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT