कोकण

स्त्रीला समाज बंधनातून मुक्त करा

CD

swt1119.jpg
30265
कट्टा ः जागतिक महिला दिन कार्यक्रमात साहित्यिका वृंदा कांबळी यांनी मार्गदर्शन केले.

स्त्रीला समाज बंधनातून मुक्त करा
वृंदा कांबळी ः कट्टा हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : ज्या देशात स्त्रीचा सन्मान होतो, त्याच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होतो. आजही शिक्षण, करिअर किंवा वैयक्तिक निर्णयात स्त्रीला समाजाच्या अपेक्षेनुसार जगावे लागते. तिला सामाजिक बंधनांत न जखडता ‘माणूस’ म्हणून जगण्याची समान संधी दिली पाहिजे. स्त्री ही केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीची शक्ती आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिका आणि कथा लेखिका वृंदा कांबळी यांनी कट्टा येथे केले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल आणि डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या ‘महिला विकास कक्ष’ तर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास कार्यालय आणि सखी वन स्टॉप सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे होत्या. व्यासपीठावर अजयराज वराडकर, सुनील नाईक, साबाजी गावडे, सुधीर वराडकर, श्रद्धा नाईक, रुपाली प्रभू, राजगोविंद मडावी, महेंद्र जाधव, दीपिका सावंत, मेघा वजराटकर, वैदेही शिरोडकर आदी उपस्थित होते.
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वृंदा कांबळी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या श्रद्धा नाईक, श्रद्धा मुसळे, दक्षता भोजणे, शुभलक्ष्मी नांदोस्कर, रेश्मा जांभवडेकर, करिना शेख, मयुरी कुबल या महिलांचाही शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
श्री. वराडकर यांनी, स्त्रियांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आहे; मात्र त्यासाठी त्यांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षा देवयानी गावडे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना, शिक्षण आणि रोजगारानेच स्त्री स्वावलंबी होईल, असे सांगितले. ॲड. प्रभू आणि श्रद्धा नाईक यांनीही मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक वीणा शिरोडकर यांनी, सूत्रसंचालन प्रा. कांचन खानोलकर यांनी केले. प्रा. श्रुती कुंभार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

Pimpri Chinchwad fire: पिंपरी-चिंचवड हादरले! भंगार गोदामातील भीषण आगीने परिसर धुराने व्यापला, ६० जवानांची शर्थ

Fifa World Cup 2026 : ९० मिनिटं, पुतळ्यासारखा उभा राहतो हा माणूस; कोण आहे Michel Nkuka Mboladinga? तो असं का करतो? Video

Kolhapur Water Lifting Ban : कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'या' नद्यांवरील पाणी उपसाबंदी अखेर शिथिल; जलसंपदा विभागाचा आदेश जारी

Tutari Express: तुतारीचं इंजिन बिघडलं, आधीच ४ तास उशिरा त्यात आणखी २ तास विलंब; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT