कोकण

ः घर हलल्यासारखे झाले अन् आमची झोप उडाली

CD

30297
एआय छायाचित्र


घर हलल्यासारखे झाले अन् आमची झोप उडाली
दुबईतील आखो देखा हाल; क्षेपणास्त्र निकामी होऊन पडत होती पण, परिस्थिती सामान्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ः ‘‘झोपेत असताना घर हलल्यासारखे झाले, त्यामुळे माझी आणि माझ्या मित्रांची झोप उडाली. नंतर मोबाईलवर विशिष्ठ प्रकारचा आवाज येण्यास सुरवात झाली. मला वाटले माझा मोबाईल खराब झाला आहे. बाहेर जाऊन पाहिले तर आकाशातून अनेक क्षेपणास्त्र निकामी होऊन पडत होती. हवाई क्षेत्र बंद झाल्यावर सुरुवातीला भीती वाटली. पण पहिल्या आणि दुसऱ्या हल्यानंतर आम्हाला विश्वास निर्माण झाला की, आपण सुरक्षित आहोत. त्यानंतर काही ढिगारे (क्षेपणास्त्रांचे अवशेष) असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. थोड्या वेळासाठी भीती पुन्हा वाढली, पण नंतर परिस्थिती सामान्य वाटू लागली. हल्यानंतरही दुबईतील सामान्य लोकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते.’’ अशी प्रतिक्रिया दुबईतील परतलेल्या पर्यटकांनी व्यक्त केली.
चिपळूण तालुक्यातील १२ पर्यटक दुबईत फिरण्यासाठी गेले होते. यातील ६ जण सातारा येथील एका कंपनीमार्फत गेले होते. तसेच अल्हाद वरवाटकर, अनिल साळुंखे, स्वप्लीन चिले, प्रकाश लटके, डॉ. गिरी व त्यांचे अन्य साथीदारही दुबईला फिरण्यासाठी गेले होते. ते ९ मार्चला परतले. हल्यानंतरचा अनुभव सांगताना साळुंखे म्हणाले, ‘‘आम्ही फिरायला गेलो होतो. २४ फेब्रुवारीला तिथे पोहोचलो. २ मार्चला माघारी जाणार होतो पण २८ फेब्रुवारीला सकाळी झोपेत असताना मोबाईलमध्ये विशिष्ठ प्रकारचा आवाज येवू लागला म्हणून मी उठलो आणि मोबाईल पाहिला तर सायरन वाजत होता. नंतर काही वेळाने जोरात आवाज झाला. बाहेर आल्यानंतर आकाशात अनेक क्षेपणास्त्र निकामी होऊन पडताना पाहिले. बाजारातील व्यवहार सुरळीत सुरू होते म्हणून सामान खरेदी करायला हॉटेलच्या बाहेर गेलो. आम्ही राहत असलेल्या हॉटेलपासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर एक क्षेपणास्त्र निकामी होताना पाहिले तेव्हा भिती वाटली. नंतर हॉटेलमध्ये गेलो.
सरकारने बाहेर पडू नका अशी सूचना केली होती. पण जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडावेच लागत होते. टीव्हीवर पर्यटकांना दुबई सरकार आणि भारत सरकारकडून मदत केली जात असल्याच्या बातम्या येत होत्या. अबुधाबी सरकार पर्यटकांच्या राहण्याचा खर्च करत असल्याचे सांगितले जात होते. काही आमदारांनी मदतीसाठी संपर्क करा आम्ही मदत करू अशा प्रकारचे आवाहन करणारे व्हिडीओ आम्ही पाहिले पण प्रत्यक्षात आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही. विमानाची उड्डाणे रद्द झाल्यामुळे जेवढे दिवस वाढले त्या दिवसाचा हॉटेल आणि जेवणाचा खर्चाचा भार आम्हालाच उचलावा लागला, असेही साळुखे यांनी सांगितले.
प्रकाश लटके म्हणाले, ‘‘आकाशात दोन क्षेपणास्त्रं निकामी होताना पाहिले. ते क्षण कधीही विसरता येणे शक्य नाही. प्रथमच असा अनुभव घेता आला. त्यानंतर ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा तीव्र आवाज ऐकू आले. संध्याकाळी साडेसात वाजता आणि मग आठ वाजताही स्फोट झाले. त्यानंतर सुमारे पाच-सहा तास शांतता होती. मग रात्री ३ वाजून ४० मिनिटांनी आणखी एक स्फोट झाला. एक मार्चला परिस्थिती अधिक गंभीर वाटत होती.’’

चौकट
...अन् त्यांना मिळाला दिलासा !
चिपळूणमध्ये राहणारे आमचे कुटुंबीय खूप चिंतेत होते. त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती नव्हती. आम्ही सुरक्षित आहोत, अन्न आणि किराणा सामानही मागवू शकतो, हे आम्ही त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. थोडक्यात दुबईमध्ये काहीही दहशत नाही. फक्त ज्या लोकांना भारतात परत यायचे आहे, त्यांना विमान उड्डाणांबाबत चिंता आहे, असे साळुंखे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पिकअप उलटून भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू, २० जण गंभीर जखमी; घटनास्थळी मृतदेहांचा खच

Earthquake in Ladakh: लडाखमध्ये पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? 150 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

SCROLL FOR NEXT