विद्यार्थ्यांच्यातील इंग्रजीची भीती घालवणारी कार्यशाळा
कारीगर रिझवान यांचा कडवईत मोफत उपक्रम; २०० जणांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी आणि त्यांना बोर्डाच्या परीक्षेत यश मिळावे, या उद्देशाने कडवई येथे मोफत इंग्रजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र उर्दू हायस्कूल व ए. ई. काळसेकर ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक कारीगर रिझवान यांच्या पुढाकारातून राबवलेल्या या उपक्रमाला पंचक्रोशीतील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दहावीच्या उत्तरपत्रिकेत प्रश्नांची उत्तरे नीटनेटकी कशी लिहावीत, वेळेचे नियोजन कसे करावे आणि गुणांची सांगड कशी घालावी, याचे सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. विशेषतः अभ्यासात गती कमी असलेल्या विद्यार्थ्यांना सहज पास होण्यासाठीच्या ‘टिप्स’ आणि हुशार विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी लागणारे कौशल्य यावर रिझवान यांनी प्रकाश टाकला.
गेल्या २० वर्षांपासून रिझवान सर हा उपक्रम विनामूल्य राबवत आहेत. आतापर्यंत परिसरातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला असून, अनेक विद्यार्थी आज विविध नामांकित क्षेत्रांत नोकरीला आहेत. या उपक्रमामुळे शाळेच्या इंग्रजी विषयाच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा आजही कायम आहे.
---------
चौकट
विद्यार्थ्यांना दिलासा
या कार्यशाळेसाठी कडवईसह तुरळ, आरवली, कुरधुंडा, कळंबस्ते या भागांतील शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांना मोफत चहा व नाश्ताही देण्यात आला. कोणत्याही प्रकारची शुल्क न घेता केवळ विद्यार्थीहितासाठी राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे पालक आणि शिक्षणक्षेत्रातून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.