कोकण

बेकायदेशीर मासेमारीला नवीन गस्ती नौकेद्वारे चाप

CD

बेकायदेशीर मासेमारीला बसणार लगाम
मत्स्य विभागाकडे वेगवान गस्ती नौका ; एलईडी अन् कमी अंतरावर पर्ससीननेटचा वावर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : रत्नागिरीपासून खोल समुद्रात कमी अंतरावर पर्ससीननेट नौका दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री एलईडी दिव्यांच्या प्रकाशात मासेमारी करत असल्याच्या तक्रारी मत्स्य व्यवसाय विभागाकडे येत आहेत. किनाऱ्यावर राजरोस चालणाऱ्या एलईडी मासेमारीने तारली मासा मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडत आहे. या बेकायदेशीर मासेमारीला आणि परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी नवीन ‘शारदा’ नावाची वेगवान बोट साहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने गस्तीसाठी घेतली आहे.
जिल्ह्यात सुमारे २८० पर्ससीननेट नौका आहेत. या नौकांना साडेबारा नॉटीकल मैल अंतराच्या आत समुद्रात मासेमारी करण्यास १ जानेवारीपासून बंदी आहे. पहिल्या दोन महिन्यात साडेबारा नॉटीकल मैल बाहेर केंद्र शासनाच्या अखत्यारितील समुद्रात जाऊन मासेमारी करणाऱ्या नौकांना खर्चा इतकी मासळी मिळत नव्हती. त्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या अनेक नौका मालकांनी बेकायदेशीरपणे किनाऱ्यावर दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री एलईडीच्या प्रकाशात मासेमारी करण्यास प्रारंभ केला. बंदरापासून जवळच्या अंतरावर मासेमारी केल्याने इंधन व इतर खर्चाची बचत होते. मोठ्या प्रमाणात तारली मासा पकडला जात आहे. त्यामुळे या तारली मासा मिरकरवाडा बंदरात मोठ्या प्रमाणात उतरला जात आहे. या मासळीला फिशमिल कंपन्यांकडे चांगला दरही मिळत आहे.
गस्ती नौके अभावी कमी वावात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांना संधी मिळते. रत्नागिरीच्या समुद्रात घुसखोरी करणाऱ्या परप्रांतीय नौकांवर लाकडी गस्ती नौकेने कारवाई करण्यासाठी जाणे धोक्याचे होते. त्यामुळे घुसखोर नौकांवरही कारवाई होत नव्हती. परंतु आता नवीन स्टीलची मजबूत वेगवान नौका साहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाला मिळाल्यामुळे बेकायदेशीर मासेमारीला आळा बसणार आहे.
---
तारली मासा जाळ्यात
अनेक नौका मालकांनी बेकायदेशीरपणे किनाऱ्यावर दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री एलईडीच्या प्रकाशात मासेमारी करण्यास प्रारंभ केला. बंदरापासून जवळच्या अंतरावर मासेमारी केल्याने इंधन व इतर खर्चाची बचत होते. मोठ्या प्रमाणात तारली मासा पकडला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT