कोकण

त्रिंबकमध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद

CD

30401


त्रिंबकमध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद
‘वाचन कला’चा उपक्रम ः विजेत्यांचा आकर्षक बक्षिसांनी गौरव
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १२ : वाचन कला विकास समिती, त्रिंबक संचलित गाडगीळ गुरुजी वाचनालयाच्या वतीने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रंगभरण, बडबडगीत, हस्ताक्षर, पाठांतर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा: रंगभरण स्पर्धा-भावेश घाडीगावकर, मयूर बाणे, कृतार्थ नाईक, उत्तेजनार्थ दिया घाडीगावकर. बडबडगीत स्पर्धा-सानवी जाधव, भावेश घाडीगावकर, कृतार्थ नाईक, उत्तेजनार्थ महेंद्र सावंत-भोसले. हस्ताक्षर स्पर्धा-गौरी वाळवे, भाविका घाडीगावकर, चिंतामणी घाडी, उत्तेजनार्थ कार्तिक घाडीगावकर. पाठांतर स्पर्धा (छत्रपती शिवाजी महाराज चरित्र)-गौरी वाळवे, भाविका घाडीगावकर, स्वरा घाडीगावकर, उत्तेजनार्थ प्रथम बागवे. स्पर्धेचे परीक्षण सुप्रिया सकपाळ, वर्षा जाधव, शैलेश वायंगणकर, विवेक जाधव व सुरेंद्र सकपाळ यांनी केले. मार्गदर्शन करताना संदीप नलावडे यांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. वाचनालयाचे अध्यक्षसु रेंद्र सकपाळ यांनी मुलांना संस्कारक्षम बोधकथा सांगितली. कार्यवाह प्रशांत मेहेंदळे यांनी सर्वांचे आभार मानले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल विवेक जाधव, सहाय्यक ग्रंथपाल चैताली सुतार, लिपिक चैताली गोसावी, शिपाई समिधा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी संतोष जंगले, पोलिसपाटील सीमा घाडीगावकर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT