swt125.jpg
30399
तळेरे ः येथील तरुणांनी शिमगोत्सव काळात साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.
‘गोमूचो नाच’ खेळातून
तळेरेत संस्कृतीचे जतन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १२ : आपली लोक संस्कृती भविष्यातही टिकून रहावी, यासाठी यावर्षीचा शिमगोत्सव येथील तरुणाईने उत्साहात साजरा केला. विविध पारंपरिक, सांस्कृतिक वेशभूषा करत संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला. होळी उत्सवात कोकणच्या मातीतील अस्सल लोककला ‘गोमूचो नाच’ उत्साहात सादर करून या तरुणांनी आपली संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
या उत्सवात तरुणांनी विविध पौराणिक आणि पारंपरिक पात्रे साकारली. नऊवारी साडी नेसून ''गोमू'' तसेच शुखासुर, राधा-कृष्ण आणि आक्राळविक्राळ राक्षसरुपे धारण केली. ढोलकीचा ठेका आणि मालवणी बोलीतील गाण्यांवर ठेका धरत संपूर्ण गाव परिसर दुमदुमून गेला. ज्येष्ठ नागरिकांनीही यात उत्साहात सहभाग घेऊन कौतुक केले. पालखी नाचवणे, गोमूचा नाच आणि शंखासुराचे खेळ ही कोकणची खरी ओळख असून येथील तरुणांनी ती अभिमानाने जपली आहे. याप्रकारे प्रत्येक गावात तरुणांनी आपल्या परंपरा जोपासल्या, तरच आपली भारतीय संस्कृती कायम टिकून राहील, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.