rat१२p१.jpg-
P२६O३०३६०
रत्नागिरी : ग्रामदैवत श्री देव भैरी
------
परंपरेनुसार भैरी देवस्थानचा शिमगोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : रत्नागिरीतील बारा वाडयांचे अधिपती व ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगोत्सवाची रविवारी रात्री सांगता झाली. श्रीदेव भैरीच्या दर्शनाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. ग्रामदैवत श्री देव भैरीचा शिमगोत्सव रूढी-परंपरेनुसार, रीतिरिवाजाप्रमाणे पारंपरिक पद्धतीत देवस्थानचे ट्रस्टी, मानकरी, गावकरी-ग्रामस्थ, गुरव मंडळी व उत्सव समिती यांच्या सहकार्याने झाला. याबद्दल ट्रस्टने सर्वांचे आभार मानले आहेत.
यासंबंधी ट्रस्टने दिलेल्या पत्रानुसार, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी रात्री १२ वाजता धुपारत व गाऱ्हाणे होऊन श्रीदेव भैरीची पालखी मंदिराबाहेर पडून श्रीदेवी जोगेश्वरी भेटीचा सोहळा, ग्रामप्रदक्षिणा व श्रीदेवी जोगेश्वरीची होळी उभी करून धुळवड व मुरूगवाडा प्रदक्षिणा साजरी केली. रंगचंपमीच्या दिवशी दुपारी १ वाजता रंग खेळण्यासाठी सहाणेवरून बाहेर पडताना पोलिस कर्मचाऱ्यांनी श्रीदेव भैरीला शस्त्र सलामी दिली. रात्री श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होऊन शिमगोत्सवाची सांगता झाली. शिमगोत्सवामध्ये झाडगाव सहाणेवर तीन दिवस पालखी भाविकांना दर्शनासाठी विराजमान होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.